#खामगाव कृषि महोत्सव : रेशीम शेती फायद्याची - सतीश भुसारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:18 AM2018-02-19T00:18:12+5:302018-02-19T00:18:19+5:30

खामगाव: शेती करताना तंत्रज्ञानाचा आधार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच शेतीतील नवनवीन बदल शेतकर्‍यांनी स्वीकारले पहिजे. शेतकर्‍यांच्या विकासासाठी रेशीम शेती हा सुद्धा उत्तम पर्याय आहे. शेतकर्‍यांनी मेहनत घेतली तर रेशीम शेती ही फायद्याचीच आहे, असे मनोगत जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील प्रगतशील शेतकरी सतीश भुसारी यांनी व्यक्त केले. 

# Khamgaon Krishi Mahotsav: Satisfactory Farming - Satish Bhusari | #खामगाव कृषि महोत्सव : रेशीम शेती फायद्याची - सतीश भुसारी

#खामगाव कृषि महोत्सव : रेशीम शेती फायद्याची - सतीश भुसारी

Next

खामगाव: शेती करताना तंत्रज्ञानाचा आधार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच शेतीतील नवनवीन बदल शेतकर्‍यांनी स्वीकारले पहिजे. शेतकर्‍यांच्या विकासासाठी रेशीम शेती हा सुद्धा उत्तम पर्याय आहे. शेतकर्‍यांनी मेहनत घेतली तर रेशीम शेती ही फायद्याचीच आहे, असे मनोगत जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील प्रगतशील शेतकरी सतीश भुसारी यांनी व्यक्त केले. 
ते खामगाव येथील कृषी महोत्सवामध्ये १८ फेब्रुवारी रोजी शेतकरी मार्गदर्शन सत्रात बोलत होते. पुढे बोलताना भुसारी म्हणाले की,  शेतीच्या बांधावर सुबाभूळ लावल्यास सुबाभळीच्या पाल्याचा उपयोग शेतीसाठी करता येईल. शेतीमध्ये उत्पन्न नियमित ठेवा. शेतात उताराला आडवी पेरणी करून दोन चर मारा. तसेच गट शेतीची संकल्पना अवलंबून उत्पादन वाढविता येईल, असेही सतीश भुसारी यांनी सांगितले. 

Web Title: # Khamgaon Krishi Mahotsav: Satisfactory Farming - Satish Bhusari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.