#खामगाव कृषि महोत्सव : रेशीम संचालनालयाने दिला शेतीला उत्तम जोडधंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:56 PM2018-02-17T12:56:08+5:302018-02-17T15:53:57+5:30
खामगाव : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कृषि महोत्सव खामगाव येथे 16 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून यात महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडून स्टाॅल लावण्यात आले आहेत.
खामगाव : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कृषि महोत्सव खामगाव येथे 16 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून यात महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडून स्टाॅल लावण्यात आले आहेत. त्यामधे रेशीम संचालनालय शेतीला उत्तम जोडधंदा कसा आहे, याचा महत्त्वपूर्ण संदेश रेशीम संचालनालयाकडून देण्यात येत आहे. नैसर्गिक रेशीम धाग्याची निर्मीती रेशीम अळीच्या कोषापासून होते. रेशीम कोष उत्पादन शेतीला उत्कृष्ट जोडधंदा असून त्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. शासनाच्या रेशीम संचालनालयाने खामगाव येथील कृषि महोत्सवात रेशीम उत्पादनांची माहिती देणारी प्रदर्शनी मांडली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे तुती लागवड व किटक संगोपन गृह बांधकाम अनुदान योजनेची माहिती स्टाॅलवरून शेतकर्यांना देण्यात येत आहे. अल्प कालावधीचे पीक असल्याने पाल्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास दुसर्या वर्षीपासून किमान पाच पीके घेता येतात. इतर पिकांच्या तुलनेत पाणी कमी लागते. तुतीच्या फांद्या व अळ्यांच्या विष्टेपासून उत्तम सेंद्रिय खत निर्मिती करता येते. अशा प्रकारे रेशीम उत्पादनांची माहि