#खामगाव कृषि महोत्सव : प्लास्टीकवर मात करणाऱ्या  वस्तूंची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 03:51 PM2018-02-17T15:51:02+5:302018-02-17T15:52:16+5:30

खामगाव : विविध वस्तूंसाठी प्लास्टीकचा वापर सध्या वाढला आहे. त्यामुळे प्लास्टिकवर मात करणाऱ्या  विविध वस्तूंची रेलचेल कृषी महोत्सवामध्ये पहावायास मिळत आहे.

# Khamgaon Krishi Mahotsav: things that beat the plastic |  #खामगाव कृषि महोत्सव : प्लास्टीकवर मात करणाऱ्या  वस्तूंची रेलचेल

 #खामगाव कृषि महोत्सव : प्लास्टीकवर मात करणाऱ्या  वस्तूंची रेलचेल

Next
ठळक मुद्देप्लास्टिकवर मात करणाऱ्या विविध वस्तू बचतगटाकडून प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत.बांबूच्या काड्यापासून बनवलेली दुर्डी, टोपले, सूप, झाडू अशा विविध वस्तू बचतगटांमार्फत प्रदर्शनामध्ये मांडण्यात आल्या आहेत.  बांबुपासून बनविलेल्या विविध शोभेच्या आकर्षक आणि दैनंदिन वापरात येणाऱ्या  वस्तू प्रदर्शनात दिसून येत आहेत.

 

खामगाव : विविध वस्तूंसाठी प्लास्टीकचा वापर सध्या वाढला आहे. त्यामुळे प्लास्टिकवर मात करणाऱ्या  विविध वस्तूंची रेलचेल कृषी महोत्सवामध्ये पहावायास मिळत आहे. बांबूच्या काड्यापासून बनवलेली दुर्डी, टोपले, सूप, झाडू अशा विविध वस्तू बचतगटांमार्फत प्रदर्शनामध्ये मांडण्यात आल्या आहेत. 
घरघुती वापरातील वस्तूंपासून विविध शाभेच्या वस्तू आता प्लास्टीकमध्ये येत आहेत. प्लास्टिकवर मात करणाऱ्या विविध वस्तू बचतगटाकडून प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. बांबुपासून बनविलेल्या विविध शोभेच्या आकर्षक आणि दैनंदिन वापरात येणाऱ्या  वस्तू प्रदर्शनात दिसून येत आहेत. संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा येथील  बादशाह महिला बचतगट, नांदुरा तालुक्यातील दहीगाव येथील संत सोनाजी महाराज महिला स्वयंसहायता समुह व नांदुरा तालुक्यातील नारखेड येथील विमल तुळशीराम अंभोरे यांनी बांबू व शिंदीपासून बनविलेल्या विविध वस्तू प्रदर्शनात आणल्या आहेत.    

Web Title: # Khamgaon Krishi Mahotsav: things that beat the plastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.