खामगाव एमआयडीसीतून २६ लाखांचा गुटखा जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:03 AM2017-09-29T01:03:32+5:302017-09-29T01:03:32+5:30
खामगाव : येथील एमआयडीसी भागातील एका मसाला पापड फॅक्ट्रीमध्ये छापा टाकून पोलिसांनी २६ लाख ६१ हजार ४५८ रु पयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने मध्यरात्री केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील एमआयडीसी भागातील एका मसाला पापड फॅक्ट्रीमध्ये छापा टाकून पोलिसांनी २६ लाख ६१ हजार ४५८ रु पयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने मध्यरात्री केली.
खामगाव एमआयडीसीतून गुटख्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी रात्री डीवायएसपी पाटील यांच्या पथकाने एमआयडीसीमधील एका मसाला पापड फॅक्ट्रीवर छापा मारला. यावेळी त्याठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा सर्व गुटखा जप्त केला आहे.
पोलिसांकडून याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अन्न, औषध प्रशासन अधिकारी संतोष सिरोसिया आपल्या पथकासह खामगावात दाखल झाले. डीवायएसपी पाटील यांच्या पथकात पीएसआय रुपेश शक्करगे, सुनील देव, सुधाकर थोरात, नितीन भालेराव, विशाल कोळी, विक्रम राठोड यांचा समावेश होता. सदर गोडाउन हे सुटाळा खुर्द येथील पोलीस पाटील मिथून कळसकार यांच्या मालकीचे असून, त्यांनी सदर गोडाउन सागर गजानन कांबळे (वय२७) रा. चांदमारी याला भाडेतत्त्वावर दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सागर कांबळे याने सदर गुटखा आपला असून, बर्हाणपूर येथून आणल्याचे पोलिसांना सांगितले.
गत महिन्यातही करण्यात आला होता गुटखा जप्त!
अवैध गुटखा विक्री करणारे मोठे रॅकेटच शहरात सक्रीय असून, ४ ऑगस्ट रोजी शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यु.के. जाधव यांनी एका वाहनातून १६ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला हो ता. यावेळी चार लाख रुपये किंमतीचे वाहनही जप्त करण्यात आले होते. गेल्या तीन महिन्यात चार ते पाच मोठय़ा कारवाया करण्यात आल्या आहेत.