पॉझिटिव्ह रुग्णांच्या घराकडे नगर पालिका फिरकतच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:26 AM2021-03-31T11:26:15+5:302021-03-31T11:26:22+5:30

Khamgaon Municipal Counsil : नगरपालिका प्रशासनाने ठेंगा दाखविल्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला हातभार लागत असल्याचे चित्र आहे.

Khamgaon Municipal Counsil does not turn to the homes of positive patients! | पॉझिटिव्ह रुग्णांच्या घराकडे नगर पालिका फिरकतच नाही!

पॉझिटिव्ह रुग्णांच्या घराकडे नगर पालिका फिरकतच नाही!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांच्या गृहभेटीकडे नगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने पाठ फिरवल्याचे दिसून येते. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करणे, घराचे व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याला नगरपालिका प्रशासनाने ठेंगा दाखविल्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला हातभार लागत असल्याचे चित्र आहे.
शहरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. संशयित किंवा कोरोनाबाधित रुग्णाचा उपजिल्हा सामान्य रुग्णालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्वप्रथम नगरपालिका वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने सतर्क होऊन रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यापासून ते संबंधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्या  माहितीची नोंद ठेवण्याची गरज आहे.  उपजिल्हा सामान्य रुग्णालयाकडून कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय यंत्रणेने मलेरिया विभागाला पूर्वसूचना देऊन फवारणीसाठी पथके रवाना करणे, बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्याची आवश्यकता असताना या विभागाची यंत्रणा तोकडी पडत असल्यामुळे समस्यांचे निराकरण होत नसल्याचे दिसत आहे. 
 

Web Title: Khamgaon Municipal Counsil does not turn to the homes of positive patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.