खामगाव पालिका कर्मचारी ड्युटीवरून थेट संपावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 07:45 AM2019-01-01T07:45:37+5:302019-01-01T08:29:40+5:30
कर वसुलीचा अखेरचा दिवस असल्याने खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत कार्यालयात सेवा दिली. कामकाज आटोपताच कर्मचारी लागलीच संपावर गेले आहेत.
अनिल गवई
खामगाव - कर वसुलीचा अखेरचा दिवस असल्याने खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत कार्यालयात सेवा दिली. कामकाज आटोपताच कर्मचारी लागलीच संपावर गेले आहेत.
नगर पालिका कर्मचाऱ्यांना विनाअट सातवा वेतन आयोग लागू करावा, रोजंदारी कर्मचारी कायम करणे, 24 वर्ष कालबद्ध पदोन्नतीची थकबाकी आदी 20 मागण्यांकरिता कर्मचारी संघटनेने 1 जानेवारीपासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी 29 डिसेंबरपासूनच विविध आंदोलनाला सुरूवात केली. मात्र, अपेक्षीत कर वसुलीसाठी खामगाव पालिका कर विभागातील कर्मचाऱ्यांनी 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत कामकाज केले. कामकाज आटोपताच कर्मचारी संपात सहभागी झाले. पालिकेचे इतर कर्मचारी कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर सहा तासांनी तर कर विभागातील 27 कर्मचारी केवळ एका मिनिटांच्या अंतराने संपात सहभागी झाले. कर निरिक्षक एस.के.देशमुख, एस.सी. हातोले, आर.बी.शहा, रितेश तिवारी, ए.एस. गवई, व्ही.एम.कपिले, व्ही.एन. सोळंके, एस.बी.मावळे, ए.बी.गोलाईत, एम.पी.सदावर्ते, बी.एल.व्यास, आर.आर.तिवारी, व्ही.जी. हिवराळे, जी.झेड चव्हाण, व्ही.एस. निंबोळकर, आर.के. तिवारी, डी.एल.वाशीमकर, एम.एच.अवकाळे, ए.टी.आसोडे, डी.आर.कल्याणकर, व्ही. एम. अग्नीहोत्री, एस.के. हेलोडे, ए.एस.देशमुख, डी.एम. ठाकूर, व्ही.व्ही.मगर आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
राज्यव्यापी आंदोलनाला पाठींबा!
नगर पालिका आणि महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला खामगाव येथील कर्मचाऱ्यांनी पाठींबा दर्शविला आहे. त्याअनुषंगाने न.प.कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनंत निळे, व महाराष्ट्र राज्य न.प.कर्मचारी संघटनेचे कार्यकारी सदस्य मोहन अहिर यांच्यासह नेतृत्वात पालिका कर्मचारी संपावर गेले आहेत.