खामगाव पालिकेच्या शाळेत एकाच वर्षात १९४ विद्यार्थ्यांची गळती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 03:10 PM2019-04-10T15:10:15+5:302019-04-10T15:10:23+5:30

- अनिल गवई   खामगाव : स्थानिक नगरपालिकेच्या इंदिरा गांधी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत मोठी घसरण झाली. मागील शैक्षणिक सत्रात ...

Khamgaon municipal school 194 students drop in the same year? | खामगाव पालिकेच्या शाळेत एकाच वर्षात १९४ विद्यार्थ्यांची गळती?

खामगाव पालिकेच्या शाळेत एकाच वर्षात १९४ विद्यार्थ्यांची गळती?

googlenewsNext

- अनिल गवई
 
खामगाव: स्थानिक नगरपालिकेच्या इंदिरा गांधी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत मोठी घसरण झाली. मागील शैक्षणिक सत्रात ३५६ इतकी असलेली पटसंख्या एकाच वर्षात १६२ पर्यंत खाली घसरली. तब्बल १९४ विद्यार्थी कमी झाल्याने ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून, इतक्या मोठ्या संख्येत विद्यार्थी गेले कुणीकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिक नगरपालिकेच्या इंदिरा गांधी नगरपालिका हायस्कूलमध्ये सन २०१७-१८ च्या संच मान्यतेनुसार पटावर ३५६ ही विद्यार्थी संख्या दर्शविण्यात आली. त्याचप्रमाणे सन २०१८-१९ मध्ये संच मान्यतेनुसार १६२ इतकी विद्यार्थी संख्या दर्शविण्यात आली. त्यामुळे शैक्षणिक वर्ष आटोपत नाही तोच दुसऱ्या शैक्षणिक वर्षात तब्बल १९४ विद्यार्थ्यांची गळती लागली. दरम्यान, पटावर दाखविलेल्या आणि प्रत्यक्षात हजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येतसुद्धा मोठी तफावत आढळून येत आहे. बोगस विद्यार्थी संख्येच्या आधारे संच मान्यतेत नियमबाह्य शिक्षकसंख्या मान्य करून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक आणि नुकसान केले. त्यामुळे ही शाळा चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टेकले हात!
पटसंख्या आणि त्याआधारे संचमान्यतेच्या घोळामुळे इंदिरा गांधी नगर परिषद हायस्कूलची वरिष्ठ स्तरावरून चौकशी केली जात आहे. मोठ्या प्रमाणातील घोळामुळे नगर पालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांनीही याप्रकरणी हात टेकल्याची चर्चा पालिका शिक्षण वर्तुळात होत आहे.

संख्या जुळविण्यासाठी शिक्षकांची धावाधाव!
शासनाकडे सादर करण्यात आलेली माहिती आणि प्रत्यक्षातील विद्यार्थी संख्येत प्रचंड तफावत आहे. त्यामुळे या शाळेतील शिक्षकांची विद्यार्थी संख्या जुळविण्यासाठी प्रचंड धावाधाव होत असल्याचे दिसून येते. परीक्षा आणि तपासणीच्या काळात विद्यार्थ्यांना स्वत: शिक्षक घेवून येताहेत. मात्र, तरीही आकडेवारीची जुळवाजुळव होत नसल्याचे दिसून येते.

Web Title: Khamgaon municipal school 194 students drop in the same year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.