खामगाव नगरपालिकेने मालमत्ताधारकांकडून तीन दिवसांत वसुल केला ५० लाखांचा कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 01:02 PM2017-12-28T13:02:13+5:302017-12-28T13:05:32+5:30

खामगाव: येथील नगर पालिकेच्या कर विभागाने  सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या उद्दीष्टपूर्तीसाठी कंबर कसली असून, या आठवड्यातील तीन दिवसांमध्ये पालिका प्रशासनाने ५० लक्ष रुपयांची वसुली केली आहे.

Khamgaon municipality collected tax from property holders | खामगाव नगरपालिकेने मालमत्ताधारकांकडून तीन दिवसांत वसुल केला ५० लाखांचा कर

खामगाव नगरपालिकेने मालमत्ताधारकांकडून तीन दिवसांत वसुल केला ५० लाखांचा कर

Next
ठळक मुद्देसन २०१७-१८ मध्ये थकीत आणि चालू एकत्रित मालमत्ताकराचे ८ कोटी ५५ लक्ष ७१ हजार २३४ रुपयांचे उद्दीष्ठ ठरविण्यात आले. कर वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर वसुलीच्या आकडेवारीत वाढ झाली आहे.सोमवार ते बुधवार या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल ५० लाख रुपयांची वसुली झाली आहे.

खामगाव: येथील नगर पालिकेच्या कर विभागाने  सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या उद्दीष्टपूर्तीसाठी कंबर कसली असून, या आठवड्यातील तीन दिवसांमध्ये पालिका प्रशासनाने ५० लक्ष रुपयांची वसुली केली आहे. मात्र, शहरातील मालमत्ताधारकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावरून खामगाव पालिका  शंभर टक्के वसुली करण्यास  अपयशी ठरणार असल्याचे संकेत आहेत.

सन २०१७-१८ मध्ये थकीत आणि चालू एकत्रित मालमत्ताकराचे ८ कोटी ५५ लक्ष ७१ हजार २३४ रुपयांचे उद्दीष्ठ ठरविण्यात आले. या उद्दीष्टाचा पाठलाग करताना करवसुलीसाठी पालिका प्रशासनाची चांगलीच दमछाक होत असून, एप्रिल २०१७ ते आॅक्टोबर २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीत पालिकेची केवळ ७८ लक्ष ८८ हजार ७९८ रुपयांची वसुली केली असून, नोव्हेंबर अखेरीस करण्यात आलेल्या रक्कमेची टक्केवारी केवळ ९.२२ टक्के एवढीच होती.   डिसेंबर महिन्यात पालिका प्रशासनाने वसुलीसाठी कंबर कसली असून, कर वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर वसुलीच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. दरम्यान, ३१ डिसेंबर नंतर कराचा भरणा केल्यास मालमत्ता धारकांना २ टक्के शास्ती लागणार आहे. परिणामी, मालमत्ता धारकांकडून  कराचा भरणा करण्यास प्राधान्य दिल्याने सोमवार ते बुधवार या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल ५० लाख रुपयांची वसुली झाली आहे. दरम्यान, मालमत्ता कर वसुलीत नगर पालिका प्रशासनाला शासकीय कार्यालयांकडून अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते.


तर लागणार दोन टक्के शास्ती!
शहरातील सर्वच मालमत्ता धारकांनी ३१ डिसेंबरपर्यंत कराचा भरणा करणे अपेक्षीत आहे. ३१ डिसेंबर नंतर कराचा भरणा करणाºयांवर २ टक्के शास्ती लावल्या जाईल. त्यामुळे मालमत्ता धारकांनी कराचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


अन्यथा नळ जोडणीही तोडणार!

३१ डिसेंबरनंतर  मालमत्ता कर वसुली मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. यामध्ये नळ कनेक्शन जोडणी कारवाईचा भाग म्हणून थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कापण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती नगर पालिका सुत्रांकडून देण्यात आली आहे.


मालमत्ता जप्तीसोबतच, इतरही कायदेशीर कारवाई  पासून सुटका करण्यासाठी, ३१ डिसेंबरपर्यंत सर्व थकबाकीदारांनी थकीत कराचा भरणा करून पालिकेस सहकार्य करावे. उद्दीष्टपूर्तीसाठी विविध उपाययोजना पालिका प्रशासनाकडून केल्या जात आहे. - धनजंय बोरीकर, मुख्याधिकारी, खामगाव

Web Title: Khamgaon municipality collected tax from property holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.