खामगाव पालिकेत आता सुशासन!
By admin | Published: July 19, 2014 12:29 AM2014-07-19T00:29:28+5:302014-07-19T00:53:54+5:30
पत्रकार परिषद : आ. सानंदा यांचा दावा.
खामगाव : गेल्या अडीच वर्षात काय झाले? यापेक्षा भविष्यात काय करायचे यावरच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा भर राहणार आहे. शहरातील विविध रखडलेली विकास कामे पुर्णत्वास नेण्याचा आपला संकल्प असून येत्या काळात शहरात आपणाला ह्यसुशासनह्णपहायला मिळणार असल्याची स्पष्ट ग्वाही आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आज शुक्रवारी येथे दिली.
नगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसचे अशोकसिंह सानंदा विजयी झाल्याने काँग्रेसचे नेते आ.सानंदा यांनी आज पालिका सभागृहात पत्र परिषद घेऊन शहराच्या विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. शहरात सर्वप्रथम साफ-सफाई मोहीम राबवून साचलेले कचर्याचे ढिगारे उचलण्यात येतील. पालिका शाळांमधून दज्रेदार शिक्षण देण्याबाबत मुख्याध्यापकांची लवकरच बैठक बोलाविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेत येणार्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाची वागणूक देऊन त्याचे समाधान करण्यात येईल. आज न.प.कर्मचार्यांची बैठक घेऊन प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यात येणार होता. परंतु संप सुरु असल्याने हे शक्य झाले नाही. पालिका कार्यालयात सर्वत्रच सी.सी.टी.व्ही. कार्यान्वीत करून लेटलतीफ कर्मचार्यांना ताळ्यावर आणण्यासाठी थंम्ब मशीन बसविण्यात येईल. नगराध्यक्ष हे प्रामणीक अधिकार्यांच्या पाठीशी राहतील. असे आश्वासन आमदार सानंदा यांनी आज दिले. यावेळी उपाध्यक्ष वैभव डवरे यांनी सांगीतले की, १५ ऑगस्ट पुर्वी ना.अजितदादा पवार खामगावात येतील. आता शहराच्या विकासावर भर देण्यात येईल असे ते म्हणाले. यावेळी अनिल नावंदर, मुख्याधिकारी नामवाड, सरस्वतीताई खासने, एन.व्ही. आमले, संजय मोकासरे गाडेकर गुरूजी आदी उपस्थित होते.