रूग्णसंख्येत वाढ झाल्याने खामगाव पालिका सतर्क; बाहेरगावहून आलेल्यांवर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 04:27 PM2020-07-07T16:27:06+5:302020-07-07T16:27:13+5:30
नगर पालिका सतर्क झाली असून, शहरात बाहेरगावहून येणाºयांवर पालिकेची करडी नजर आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहर आणि परिसरात कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका वाढीस लागला आहे. खामगाव शहरातील कोरोना रूग्णांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. त्यामुळे नगर पालिका सतर्क झाली असून, शहरात बाहेरगावहून येणाºयांवर पालिकेची करडी नजर आहे. प्रामुख्याने कोरोना हॉटस्पॉट असलेल्या अकोला येथून होणाºया हालचालींवर पालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या रूग्णात खामगाव आणि परिसरात आता झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी, बाहेरगावहून येणाºयांवर नगर पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोना काळातील शिथिलतेचा गैरफायदा घेणाºयांवरही पालिका प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली जात आहे. तसेच उघड्यावर खाद्य पदार्थ विकणाºयांविरोधात नगर पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. औषध विक्रेते आणि वैद्यकीय उपचार करणाºयांना आवश्यक त्या सूचना पालिका प्रशासनाकडून दिली जात आहे. नगर पालिका प्रशासनासोबतच पोलिस प्रशासनाने मिशन आॅल आऊट हाती घेतले आहे.
खामगावात आले ८८१ प्रवासी!
कोरोना विषाणू संक्रमणाच्या कालावधीत परजिल्ह्यातून तब्बल ८०० जणांनी खामगावात प्रवास केला. त्याचवेळी ८१ जण खामगावात आले. नगर पालिका प्रशासनाकडून या ८८१ जणांची तपासणी पूर्ण करण्यात आली. यामध्ये ८७२ जणांनी होम क्वारंटीनचा कालावधी पूर्ण केला. तर ७ जण होम क्वारंटीनमध्ये आहेत. एका व्यक्तीने संस्थात्मक क्वारंटीन पूर्ण केला असून, तीन जण अद्यापही संस्थात्मक क्वारंटीनमध्ये आहेत.
अति जोखीमग्रस्त व्यक्तींचे विशेष सर्व्हेक्षण!
कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने अतिजोखीम व्यक्तींचे विशेष सर्व्हेक्षण करून संनियंत्रित करण्यासाठी मेडीकल/ औषधी दुकानांमधून सर्दी, ताप, खोकला, थंडी कोणत्याही व्यक्तीस डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी देऊ नये. तसेच अशा व्यक्तीचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक पत्ता आणि औषध दिल्याची तारीख आदी माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणू संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहे. अतिजोखीम व्यक्तीचे सर्व्हेक्षण हाती घेण्यात आले आहे. यासाठी औषध विक्रेत्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
- धनंजय बोरीकर
मुख्याधिकारी, खामगाव.