खामगाव पालिकेत आता अद्ययावत प्रणालीद्वारे करवसुली! राज्यातील १५ पालिकांमध्ये निवड

By अनिल गवई | Published: August 18, 2022 05:37 PM2022-08-18T17:37:03+5:302022-08-18T17:47:48+5:30

Khamgaon Municipality: पश्चिम विदर्भात संगणकीकृत कर वसुलीत अग्रेसर असलेल्या खामगाव नगर पालिकेत यापुढे अद्ययावत प्रणालीद्वारे कर वसुली केली जाईल. एबीएम सॉफ्टवेअर कंपनीशी करार संपुष्टात आल्यानंतर १० आॅगस्टपासून खामगाव पालिकेची कर वसुली प्रभावित झाली

Khamgaon Municipality now collects tax through the emerging system! Selection in 15 municipalities of the state | खामगाव पालिकेत आता अद्ययावत प्रणालीद्वारे करवसुली! राज्यातील १५ पालिकांमध्ये निवड

खामगाव पालिकेत आता अद्ययावत प्रणालीद्वारे करवसुली! राज्यातील १५ पालिकांमध्ये निवड

Next

- अनिल गवई
खामगाव - पश्चिम विदर्भात संगणकीकृत कर वसुलीत अग्रेसर असलेल्या खामगाव नगर पालिकेत यापुढे अद्ययावत प्रणालीद्वारे कर वसुली केली जाईल. एबीएम सॉफ्टवेअर कंपनीशी करार संपुष्टात आल्यानंतर १० आॅगस्टपासून खामगाव पालिकेची कर वसुली प्रभावित झाली असून, येत्या दोन-तीन दिवसांत अद्ययावत कर वसुली प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. राज्यातील दोन महापालिका आणि १३ पालिकांमध्ये उद्ययावत प्रणाली वापरासाठी खामगाव पालिकेचा समावेश आहे. या प्रणालीचा वापर करणारी खामगाव पालिका ही पहिलीच पालिका ठरणार आहे, हे येथे उल्लेखनिय!
खामगाव नगर पालिकेत सन २०१२-१३ पासून महाराष्ट्र नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडून राज्यभर वापरले जाणारे एबीएम सॉफ्टवेअर वापरणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे १० आॅगस्ट २०२२ पासून नगर पालिकेतील कर वसुली प्रभावित झाली आहे. दरम्यान,

नगर पालिकेच्या विविध विभागांचे काम पाहिले जाणाºया सॉफ्टवेअरमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. वारंवार होणाºया अडचणी लक्षात घेऊन आणि आॅगस्ट २०२२ पासून खामगाव नगर पालिका संपूर्ण नगरपालिका क्षेत्रात उद्ययावत प्रणालीद्वारे  मालमत्ता कर लागू करून करआकारणी सुरू करणार आहे.

नवीन सॉफ्टवेअरचा होणार वापर!
- एबीएम सॉफ्टवेअरचा वापर बंद करण्यात आल्यानंतर महाआयटी सेल सुचविलेल्या आणि राज्यातील १५ नगर पालिकांची निवड झालेल्या इनोव्हेव आयटी इन्फ्रा प्रा.लि.ने विकसीत केलेले सॉफ्टवेअर खामगाव पालिकेसह राज्यातील १५ पालिकांमध्ये एकाचवेळी वापरले जाणार आहे. पश्चिम विदर्भात एकमेव खामगाव नगर पालिकेची या अद्यावत प्रणालीसाठी निवड झाली आहे. हे विशेष.

घरूनही भरता येणार टॅक्स...
कर वसुलीसाठी नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे. या प्रणालीत नागरिकांना घरूनही टॅक्स भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. शिवाय कर्मचाºयांनाही वर्क फॉर्म होम तसेच नागरिकांना आवश्यक त्या वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.

 या स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश
- उल्हास नगर आणि पनवेल महापालिकेसह खामगाव, बदलापूर, अंबरनाथ, खोपोली, रोहा, अलिबाग, सावंतवाडी, मुरबाड, लांजा, सातारा, जालना, भंडारा आणि जामनेर नगर पालिकांचा अद्ययावत प्रणालीद्वारे कर वसुलीसाठी समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Khamgaon Municipality now collects tax through the emerging system! Selection in 15 municipalities of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.