खामगाव नगर पालिका कर्मचारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 03:47 PM2019-01-01T15:47:30+5:302019-01-01T15:47:37+5:30
खामगाव : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसह खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. पालिकेच्या प्रवेशद्वारावरच या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसह खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. पालिकेच्या प्रवेशद्वारावरच या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे पालिकेतील अनेक विभागांना मंगळवारी कुलूप दिसून आले. या संपामुळे पालिकेतील महत्वाच्या विभागासह अत्यावश्यक सेवाही प्रभावित झाल्या आहेत.
नगर पालिका कर्मचाऱ्यांना विनाअट सातवा वेतन आयोग लागू करावा, रोजंदारी कर्मचारी कायम करणे, २४ वर्ष कालबद्ध पदोन्नतीची थकबाकी आदी २० मागण्यांकरिता कर्मचारी संघटनेने १ जानेवारीपासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला होता. टप्प्या-टप्प्याने शनिवारपासून पालिका कर्मचाºयांनी आंदोलनही छेडले. या आंदोलनाचा शेवटचा टप्पा म्हणून मंगळवारपासून कर्मचाºयांनी कामबंद (संप) आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी नगर परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंत निळे आणि कार्यकारी सदस्य मोहन अहीर, मंगेश पंचभुते, सुभाष शेळके, दुर्गासिह ठाकूर, सुनील सोनोने यांच्या नेतृत्वात पालिका कर्मचाºयांनी निदर्शने केली.
लोकप्रतिनिधींची संप स्थळी भेट!
नगर पालिका कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला तसेच कर्मचाºयांच्या न्याय मागण्यांना पाठींबा दर्शविण्यासाठी खामगाव मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन स्थळास भेट दिली. पालिकेसमोरील मंडपात त्यांनी पालिकेच्या विविध कर्मचाºयांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे खामगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा यांच्यासह काँग्रेस पदाधिकाºयांनीही पालिका कर्मचाºयांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला.
पाच कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर पालिकेचे कामकाज!
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नगर पालिकेतील कर्मचारी संपावर गेल्यामुळे शहरातील विविध सेवा प्रभावित झाल्या. दरम्यान, वैभव माळवंदे, मनोज राजपूत या कंत्राटी कर्मचाºयांसह रचना सहाय्यक अनुराग घीवे, रचना सहाय्यक सागर काळे आणि गोपाल तार्डे या नव्यानेच रूजू झालेल्या पाच कर्मचाºयांनी पालिकेचे कामकाज सांभाळले.