आॅनलाईन जन्म-मृत्यू नोंदणीत खामगाव पालिका अव्वल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 01:40 PM2018-11-03T13:40:50+5:302018-11-03T13:42:14+5:30
खामगाव: कर, बांधकाम आणि नगर रचना विभागाकडून अब्रुचे वाभाडे काढल्या जात असतानाच, खामगाव पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडून एक गोड बातमीय मिळतेय. या विभागातील कर्मचाºयांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे केंद्र शासनाच्या ‘सीआरएस’पोर्टलवर जन्म-मृत्यू नोंदणीत खामगाव पालिका जिल्ह्यात अव्वल ठरली आहे.
- अनिल गवई
खामगाव: कर, बांधकाम आणि नगर रचना विभागाकडून अब्रुचे वाभाडे काढल्या जात असतानाच, खामगाव पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडून एक गोड बातमीय मिळतेय. या विभागातील कर्मचाºयांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे केंद्र शासनाच्या ‘सीआरएस’पोर्टलवर जन्म-मृत्यू नोंदणीत खामगाव पालिका जिल्ह्यात अव्वल ठरली आहे.
आॅनलाईन नोंदणीप्रणालीत ३ स्तरावर कार्य केले जाते. यामध्ये सुरूवातीला संस्थांकडून नोंदणी, नंतर पडताळणी आणि नंतर अधिकृत क्यू आर कोड जनरेट केल्या जातो. ‘सीआरएस’पोर्टलवर जन्म-मृत्यूच्या नोंदणीला जिल्ह्यात जानेवारी २०१६ मध्ये खामगाव पालिकेतून सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला काही अडथळे आलीत. मात्र, सर्वच अडथर्ळ्यांची शर्यंत पार करीत, खामगाव पालिकेने वेळोवेळी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जन्म-मृत्यूच्या आॅनलाईन नोंदणीत खामगाव पालिकेने जिल्ह्यातील उर्वरित पालिकांना कधीचेच मागे टाकले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी पालिका म्हणून खामगाव पालिकेचा नाव लौकीक आहे. खामगाव शहरा लगतच्या खेडेगावासह शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर येथील नागरिक खामगाव येथील सामान्य रुग्णालयात प्रसुती आणि उपचारासाठी येथे येतात. त्यामुळे खामगावात जन्म-मृत्यू नोंदणीचे प्रमाण मोठे असून, महिन्याकाठी सरासरी ७०० च्यावर जन्म तर १५० च्यावर मृत्यूची नोंदणी येथे होते. तथापि, जन्म-मृत्यू आणि रेकॉर्ड विभागातील विभाग प्रमुख राजेश मुळीक, कमलाकर चिकणे, चेतन सारसर या अवघ्या तीन कर्मचाºयांनी जन्म-मृत्यू नोंदणी विभागाला नगराध्यक्ष अनिता डवरे, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्या मार्गदर्शनात नावलौकीक मिळवून दिला. त्यामुळे या विभागातील कर्मचाºयांचे जिल्हास्तरावर कौतुक होत आहे.
प्रमाणपत्राची अधिकृत पडताळणी सहज शक्य!
आॅनलाईन नोंदणी झालेल्या जन्म-मुत्यू प्रमाणपत्रावर ‘क्यू आर कोड’ प्रणालीचा व डिजीटल स्वाक्षरीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे प्रमाणपत्रांची अधिकृत पडताळणी करणे सहज शक्य आहे.
जन्म-मृत्यू/ रेकॉर्ड विभागाचे अद्ययावतीकरण!
खामगाव पालिकेतील जन्म-मृत्यू आणि रेकॉर्ड विभागाचे अद्ययावतीकरण करण्यात आले. सोबतच संपूर्ण संगणकीकृत प्रणाली या विभागात कार्यान्वित करण्यात आली. पालिकेतील सर्वात जास्त रेकॉर्ड या विभागात आहेत. हे रेकॉर्ड गठ्ठा पध्दतीने सुस्थितीत संग्रहीत ठेवण्यात आलेत. तसेच विभागात येणाºया नागरिकांना विनामुल्य अर्ज नमुने, पिण्याचे पाणी, बसण्याची सुविधा देखील येथे उपलब्ध आहे.
दंडामुळे विलंबाने नोंदणीस चाप!
शासकीय तसेच खासगी रुग्णालय तसेच पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील जन्म-मृत्यूची विहित मुदतीत नोंदणी करण्यासाठी सुरूवातीला पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर नोंदणीमध्ये विविध सुधारणा करण्यात आल्या. नोंदणीस विलंब झालेल्या संस्थांना विलंब शुल्क आकारण्यात आले. त्यामुळे विलंबाने नोंदणीस चाप बसला असून, नागरिकांचा त्रास कमी झाला.
आॅनलाईन जन्म नोंदणी (जाने. २०१६ पासून)
सन पुरूष स्त्री एकुण
२०१६ ३५५७ ३३३५ ६८९२
२०१७ ३९८३ ३६८९ ७६७२
२०१८ ३०३८ २७१० ५७४८(सप्टेंबरपर्यंत)
आॅनलाईन मृत्यू नोंदणी (जाने. २०१६ पासून)
सन पुरूष स्त्री एकुण
२०१६ ५७८ ३६१ ९३९
२०१७ ४९७ ३३७ ८३५(तृतीयपंथी-१)
२०१८ ३७१ २३५ ६०६(सप्टेंबरपर्यंत)
आॅनलाईन जन्म-मृत्यू नोंदणीस खामगाव पालिकेकडून प्राधान्य दिले जात आहे. या नोंदणी प्रक्रीयेतील सर्व अडथळे दूर करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात खामगाव पालिकेचा नावलौकीक उंचावला आहे.
- राजेश मुळीक, विभागप्रमुख जन्म-मृत्यू विभाग, नगर परिषद, खामगाव.