खामगाव पालिकेची कर वसुली ३५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 03:41 PM2019-12-27T15:41:40+5:302019-12-27T15:41:48+5:30

शंभरटक्के कर वसुलीच्या दृष्टीकोनातून शहरातील २७ हजार मालमत्ता धारकांसह शासकीय कार्यालयांना पालिका प्रशासनाने पत्र दिले आहे.

Khamgaon municipality's tax collection is 5% | खामगाव पालिकेची कर वसुली ३५ टक्के

खामगाव पालिकेची कर वसुली ३५ टक्के

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली असून, ३१ डिसेंबरपर्यंत कर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे पालिका प्रयत्नकरीत आहे. गुरूवारी सायंकाळपर्यंत पालिकेच्या तिजोरीत ३.५० कोटी रुपयांचा भरणा झाला असून, शंभरटक्के कर वसुलीच्या दृष्टीकोनातून शहरातील २७ हजार मालमत्ता धारकांसह शासकीय कार्यालयांना पालिका प्रशासनाने पत्र दिले आहे.
दरम्यान, विहित मुदतीच्या आत कराचा भरणा न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई म्हणून प्रतिमाह दोन टक्के शास्ती लागू करण्याचा निर्णयही पालिका प्रशासनाने घेतला आहे.
नगर पालिका प्रशासनाच्या कर विभागाकडून मालमत्ता कराच्या वसुलीसाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. शहरात एकुण २७ हजार मालमत्ता आहेत. अपेक्षीत उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाची चांगलीच दमछाक होते. ऐनवेळी घाई नको म्हणून पालिका प्रशासनाने यावर्षीचा आर्थिक कर ३१ डिसेंबरपर्यंत भरण्याची मुदत दिली आहे. मुदतीत कर न भरणाऱ्यांना २ टक्के शास्ती लावण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

Web Title: Khamgaon municipality's tax collection is 5%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.