बालीकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्या ऑटो चालकास शिक्षा

By अनिल गवई | Published: March 17, 2023 09:03 PM2023-03-17T21:03:34+5:302023-03-17T21:03:40+5:30

ऑटोचालकाने आपल्या ताब्यातील ऑटो भरधाव आणि निष्काळजीपणे चालवित काही दुचाकी स्वारांना ओव्हरटेक केले.

khamgaon news, Punishment to auto driver who caused girl's death | बालीकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्या ऑटो चालकास शिक्षा

बालीकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्या ऑटो चालकास शिक्षा

googlenewsNext

खामगाव: भरधाव ऑटो उलटवून बालीकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्या ऑटो चालकाला  प्रथम वर्ग कोर्ट क्र.२ न्यायदंडाधिकारी ओंकार साने यांनी आरोपी दोषी ठरवून भादंविचे कलम २७९ मध्ये दोन महिने साधा कारावास व १ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

चिंचपूर येथील राजू डिडोळकर, त्यांच्या पत्नी  िडडोळकर आणि साडेतीन वर्षाची मुलगी कु. चंचल डिडोळकर  हे तिघे एमएच २८ एम एच २८एच-५६४३ या ऑटोतून १३ एप्रिल २०१८ रोजी प्रवास करीत होते. यावेळी ऑटोचालकाने आपल्या ताब्यातील ऑटो भरधाव आणि निष्काळजीपणे चालवित काही दुचाकी स्वारांना ओव्हरटेक केले. त्यानंतर अनियंत्रित झालेला ऑटो समोर जाऊन उलटला.

यात चिंचपूर डिडोळकर दाम्पत्यासह साडेतीन वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली. दरम्यान, ऑटो चालकाने ओव्हरटेक केल्या दुचाकींपैकी श्रीधर शालीग्राम देशमुख रा. चिंचपूर यांनी स्थानिकांच्या मदतीने ऑटो सरळ करून जखमींना बाहेर काढले. िडडोळकर दाम्पत्य आणि चिमुकलीला खामगाव येथील सामान्य रूग्णालयात दाखल केले.

येथे तपासणी अंती डॉक्टरांनी चिमुकलीला मृत घोषीत केले. तर जखमींना अकोला येथे हलविण्यात आले.  अपघात झाल्यावर ड्रायव्हर पळून गेला. दरम्यान याप्रकरणी िचंचपूर येथील श्रीधर देशमुख यांनी  वाहन नोंदणी क्रमांक एमएच२८-एच-५६४३ च्या चालकाविरूध्द फिर्याद दिली. यावरून भादंिव कलम  ३०४(अ), ३३७, २७९ व मो. वा. कायदा कलम १३४ (ब), ३ (१)/ १८१ नुसार गुन्हा दाखल होवून दोषारोपपत्र सादर झाले.   तपासात सोहेल अहमद शेख आलम वय २३ वर्षे रा. लाखनवाडा हा निषण्ण झाल्याने त्याचे विरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्यात आले.  

अभियोग पक्षातर्फे एकुण ७ साक्षीदार तपासण्यात आले. वि. सरकारी अभियोक्ता अजय इंगळे यांचा युक्तीवाद व साक्षीदारांनी दिलेली साथ ग्राह्य मानण्यात येवून  न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट क्र.२ चे न्या.ओंकार  साने यांनी आरोपी दोषी ठरवून भादंविचे कलम २७९ मध्ये दोन महिने साधा कारावास व १ हजार रूपये दंड कलम ३०४ (अ) मध्ये २ वर्ष साधा कारावास व ३ हजार रूपये दंड कलम ३३७ मध्ये १ महिना साधा कारावास व ५०० रूपये दंड तसेच मो.वा.कायदा कलम १३४/१७७ नुसार दंडाची शिक्षा १६/०३/२०२३ रोजी सुनावली. सदर शिक्षा ह्या एकत्रितपणे भोगावयाच्या असल्याचे निकालपत्रात नमूद केले आहे.

Web Title: khamgaon news, Punishment to auto driver who caused girl's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.