खामगाव:विनाकारण फिरणाऱ्या ९३२ जणांवर दंडात्मक कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 02:56 PM2020-04-17T14:56:32+5:302020-04-17T14:56:52+5:30

७२ जणांविरोधात कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Khamgaon: punitive action against 90 people without cause! | खामगाव:विनाकारण फिरणाऱ्या ९३२ जणांवर दंडात्मक कारवाई!

खामगाव:विनाकारण फिरणाऱ्या ९३२ जणांवर दंडात्मक कारवाई!

Next

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना संचारबंदी काळात विनाकारण दुचाकीने फिरणाºया ९३२ जणांवर शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तर ७२ जणांविरोधात कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळे शहरातील गर्दी नियंत्रणात आणण्यात पोलिस प्रशासनाला यश आले.
बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात २१ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत बाहेरगावच्या नागरिकांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिस प्रशासनाकडून दुचाकी वाहने वापरण्यास  मनाई करण्यात आली आहे. मात्र, तरी देखील शहरात दुचाकींचा वापर थांबत नसल्याचे निदर्शनास येताच शहर पोलिसांनी संबधितांवर कारवाई सुरू केली. यामध्ये दररोज सरासरी ३०-३५ कारवाई करण्यात आल्या. गुरूवार १६ एप्रिल रोजी   ५४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर शुक्रवार १७ एप्रिल रोजी ६३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आतापर्यंत शहर पोलिस ९३२ जणांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे विनाकारण बाहेर फिरणाºयांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
 
७२ जणांविरोधात गुन्हा दाखल!
संचारबंदी काळात दुचाकीवर विनाकारण फिरणाºया डबलसीट धारकांना पोलिसांनी चांगलेच धारेवर धरले. या कारवाई दरम्यान ७२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच अनेकांना दंडुक्याचा प्रसाद देण्यात आला. काही दुचाकी धारकांना उठबशांचीही शिक्षा देण्यात आली. बँकासमोर गर्दी करणाºयांना अनेकांना पोलिसांनी वठणीवर आणले.
 
शहर पोलिस निरिक्षकांची अशीही संवेदनशीलता!
शुक्रवारी कारवाई दरम्यान कंझारा येथील एका शेतकºयाला शहर पोलिसांनी पकडले. त्याला शहर पोलिस स्टेशनच्या आवारात बसविले. प्रत्येकाची चौकशी सुरू असताना, पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्याकडे या शेतकºयाने आपली व्यथा मांडली. शेतकºयांने सांगितलेल्या हकीकतीची शहनिशा केल्यानंतर शहर पोलिस निरिक्षक अंबुलकर यांनी त्याला कोणतीही कारवाई न करता सोडून दिले. इतकेच नव्हे तर स्वत:च्या खिशातून मदत देत, त्याला आधार दिला. मुलाच्या औषधीसाठी हा शेतकरी शहरात भाजी विक्रीसाठी आला होता. हे येथे उल्लेखनिय!

 
संचारबंदी काळात दुचाकी, तिनचाकी वाहनांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाºयांनी तशा सूचना दिल्या आहेत. नियमांचे पालन न करणाºया विरोधात शहर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये.
- सुनिल अंबुलकर
पोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन, खामगाव.
 

Web Title: Khamgaon: punitive action against 90 people without cause!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.