खामगाव तालुका @ ८४.८६
By Admin | Published: June 14, 2017 01:48 AM2017-06-14T01:48:47+5:302017-06-14T01:48:47+5:30
खामगाव तालुक्याचा निकाल ८४.८६ टक्के लागला आहे. यात ९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये खामगाव तालुक्याचा निकाल ८४.८६ टक्के लागला आहे. यात ९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
खामगाव तालुक्यातून एकूण ४९८४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ४२३८ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये सेंट अॅन्स स्कूल, लॉयन्स ज्ञानपीठ, सरस्वती विद्या मंदिर खामगाव, सहकार विद्या मंदिर पिं.राजा, निवासी मूकबधीर विद्यालय, जिकरा हायस्कूल, खामगाव, जागृती ज्ञानपीठ शेलोडी, जागृती विद्यालय, आंबेटाकळी, श्री.जे.पी.पाटील विद्यालय,वझर या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुक्यातील उर्वरीत शाळांमध्ये राणा लकी सानंदा शावर खामगाव ९८.५० टक्के, जि.प.विद्यालय, पिं.राजा ८४.३१ टक्के, श्री जे वी मेहता विद्यालय ७० .६९ टक्के, जि.प.कन्या शाळा खामगाव ७६.६१ टक्के, अ.खि.नॅशनल हायस्कूल, ८४.४७ टक्के,केला हिंदी विद्यालय ७६.७६ टक्के , म्युनिसिपल विद्यालय ३३.३३ टक्के , जि.प.शाळा बोथाकाजी ९२.१८ टक्के, जि.प.विद्यालय गणेशपूर ९५.८३ टक्के, जि.प.विद्यालय रोहणा ८३.०९ टक्के, जि.प.विद्यालय पळशी बु. ८७.३५ टक्के, जि.प.शाळा गोंधनापूर ८८.६७ टक्के, अंजूमन हायस्कूल, खामगाव८५.३२ टक्के, महाराष्ट्र विद्यालय खामगाव, ७१.९० टक्के, लाल बहादूरशास्त्री विद्यालय हिवरखेड ८७.०६ टक्के, श्री गुप्तेश्वर विद्यालय शिर्ला नेमाने ७१.१५ टक्के, सरलाबाई डिगांबर विद्यालय घाटपुरी ६८.७५ टक्के, टिळक राष्ट्रीय विद्यालय खामगाव ७९.१६ टक्के, लष्करिया नूरबानो नॅशनल उर्दू हायस्कूल लाखनवाडा, ९५.३७ टक्के, भास्करराव शिंगणे विद्यालय बोरजवळा, ९६.९६ टक्के, सदगुरु भोजने महाराज विद्यालय अटाळी ८१.४८ टक्के, अहिल्यादेवी होळकर विहीगाव ९८.७८ टक्के, श्री कोकरे विद्यालय ढोरपगाव ९४.८५ टक्के, कोकरे आश्रमशाळा पाळा, ९८.११ टक्के, आदर्श विद्यालय निपाणा ९२.७७ टक्के, महात्मा फुले विद्यालय हिंगणा ९२.८५ टक्के, पृथ्वीराज चव्हाण विद्यालय निमकवळा, ८७.७५ टक्के, संत गुलाबबाबा विद्यालय, वर्णा ९७.५६ टक्के, स्व.भैय्याभाऊ पाटील विद्यालय बोरीअडगाव ९७.०५ टक्के. जागृती विद्यालय टेंभूर्णा ८५.७१ टक्के, उर्दू म.वि.पिराजा, ८०.२८ टक्के,महात्मा फुले विद्यालय मांडका ८४.१४ टक्के, महात्मा फुले विद्यालय अंत्रज, ८९.६९ टक्के,महात्मा फुले विद्यालय गवंढाळा ९६.८७ टक्के, सावित्रीबाई फुले विद्यालय शहापूर८५.५४ टक्के, संत नारायण विद्यालय आंबेटाकळी ९५ टक्के, महाराष्ट्र विद्यालय लांजूड ८८.२३ जि.जा.विद्यालय, चिंचपूर ९३.९३ टक्के, अ.समद विद्यालय कंझारा ९३.३३ टक्के, शाहू,फुले,आंबेडकर विद्यालय लाखनवाडा ९२.५० टक्के मजिदीया उर्दू विद्यालय गोंधनापूर ६३.३३ टक्के, सौ.पी.जे.पाटील विद्यालय बोरीअडगाव ९५.१२ टक्के, मिल्लत उर्दू विद्यालय खामगाव ९२ टक्के, अनुसूचित जाती विद्यालय ८८.३७ टक्के, गुलशने हाफिजा उर्दू हायस्कूल माथनी ६२.५ टक्के, स्व.बी.एस.उमाळे विद्यालय चितोडा ८९.२८ टक्के,मिशन हायस्कूल खामगाव ९२.३० टक्के, एबीनेजर विद्यालय खामगाव ९२.३० टक्के असा निकाल लागला आहे.