खामगाव तालुक्यातील शेतीला मिळणार नवीन तंत्रज्ञानाची जोड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:43 PM2019-02-22T12:43:04+5:302019-02-22T12:47:44+5:30

खामगाव :  पारंपारिक पिक पध्दतीला फाटा देत खामगाव तालुक्यातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतात नवनवीन तंत्रज्ञाचा अवलंब करू पाहताहेत. याकरीता प्रयत्नशिल शेतकºयांसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतीत राबविण्यात येत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी खामगाव तालुक्यातील शेतकºयांना अभ्यास दौºयावर पाठविण्यात आले आहे.

Khamgaon taluka farming will get new technology! | खामगाव तालुक्यातील शेतीला मिळणार नवीन तंत्रज्ञानाची जोड!

खामगाव तालुक्यातील शेतीला मिळणार नवीन तंत्रज्ञानाची जोड!

googlenewsNext

- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  पारंपारिक पिक पध्दतीला फाटा देत खामगाव तालुक्यातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतात नवनवीन तंत्रज्ञाचा अवलंब करू पाहताहेत. याकरीता प्रयत्नशिल शेतकºयांसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतीत राबविण्यात येत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी खामगाव तालुक्यातील शेतकºयांना अभ्यास दौºयावर पाठविण्यात आले आहे.
पारंपारिक पिक पध्दतीतून येणारे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाणही कमी होत असल्यसाने शेतकºयांच्या शेतांमधिल विहीरी, बोअरवेलच्या पाणी पातळीत कमालीची घट आली आहे. परिणामी आहे त्या पाण्यावर पिक घेणे कठीण होवून बसले आहे. एकीकडे पाण्याची कमतरता तर दुसरीकडे तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे शेती तोट्याचा व्यवसाय होवून बसली आहे. अशा अवस्थेतही खामगाव तालुक्यातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतात नवीन प्रयोग करू पाहताहेत. अशा प्रयोगशिल शेतकºयांचे मनोबल उंचाविण्यासाठी तसेच त्यांना नवनवीन तंत्रज्ञान अभ्यासता यावे, यासाठी कृषी विभागाकडून खामगाव तालुक्यातील अनेक शेतकºयांना पश्चिम महाराष्ट्रात अभ्यास दौºयासाठी पाठविण्यात आले आहे. पंढरपूर विभागात प्रगत शेतकºयांच्या शेतात वापरण्यात आलेले नवीन तंत्रज्ञान व पिक पध्दतीचा अभ्यास करून शेतकरी आपल्या शेतात तसे प्रयोग करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार आहेत.

 
एकात्मिक फलोत्पादन अभियान!
एकात्मिक फलोत्पादन अभियान २०१८-१९ अंतर्गत खामगाव येथून पंढरपूर विभागासाठी शेतकरी अभ्यास दौºयावर रवाना झाले आहेत. यात फळबाग लागवड करणारे शेतकरी तसेच भाजीपाल्याचे उत्पादन घेणाºया शेतकºयांचा समावेश आहे. पंढरपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचे धडे घेणार आहेत. या दौºयात ४८ शेतकºयांचा समावेश असून खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अ‍ॅड.आकाश फुंडकर यांनी शेतकºयांच्या गाडीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी पवार यांच्यासह कृषी विभागातील कर्मचाºयांची उपस्थिती होती.

Web Title: Khamgaon taluka farming will get new technology!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.