कोविड-१९ टेस्टमध्ये खामगाव तालुका आघाडीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 01:10 PM2020-10-30T13:10:41+5:302020-10-30T13:10:52+5:30
Khamgaon Covid-19 Test कोरोना चाचण्यांमध्ये खामगाव तालुक्याने जिल्ह्यात बाजी मारली आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत सर्वाधिक कोरोना चाचण्यांमध्ये खामगाव तालुक्याने जिल्ह्यात बाजी मारली आहे. त्याचप्रमाणे विविध प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने घेण्यात आलेल्या शिबिरांमध्येही खामगाव तालुक्याची आघाडी असून शिबिरांमध्ये सर्वाधिक अडीच हजार नागरिकांची गत १५ दिवसांत तपासणी करण्यात आली. खामगाव तालुक्तयात तपासणी आणि िशबिरांची आकडेवारी जिल्हयात सर्वाधिक आहे. परिणामी,कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाल्याचे दिसून येते.
खामगाव तालुका कोरोना विषाणू संसर्गाचे हॉस्टस्पॉट केंद्र ठरण्याची भीती ठरत असतानाच, आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे कोरोना रूग्ण संख्येवर नियंत्रण मिळविता आल्याची चर्चा आहे.गत पंधरवाड्यात खामगाव तालुक्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. खामगाव तालुक्यात करण्यात आलेल्या कारोना टेस्ट आणि शिबिरांची संख्या ही बुलडाणा जिल्हयात सर्वाधिक असल्याचे वैदयकीय सुत्रांचे म्हणणे आहे.
अशी घेण्यात आली शिबिरे
पिंपळगाव राजा-०३, रोहणा-०३, गणेशपूर-०४, अटाळी-०५, बोथाकाजी-०२, लाखनवाडा-०२, निमकोहळा-०२, हिवरखेड-०२, घारोड-०२, वझर-०२ तर पारखेड, प्रिंपी देशमुख, भालेगाव बाजार, जळका भडंग, सुटाळा, वर्णा, कोंटी, गारडगाव, चिंचपूर, प्रिंपी कोरडे, अंत्रज, नायदेवी, लोखंडा, शिराळा, विहिगाव, शिर्ला, आवार, पेंडका, गंवढाळा, आंबेटाकळी, चितोडा, शहापूर, बोरी, हिंगणा, उमरा, लोणी या गावांमध्ये प्रत्येकी ०१ शिबिर घेण्यात आले.