खामगावात तीन देशीकट्टे, चार जीवंत काडतुसे पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 11:47 AM2021-11-24T11:47:50+5:302021-11-24T11:48:03+5:30

Crime News : अमरावती जिल्ह्यातील साबीरखान याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

In Khamgaon, three indeginious pistols and four live cartridges were seized | खामगावात तीन देशीकट्टे, चार जीवंत काडतुसे पकडली

खामगावात तीन देशीकट्टे, चार जीवंत काडतुसे पकडली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: गुप्त माहितीच्या आधारे अपर पोलीस अधिक्षक पथकाने खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव फाट्यावर तीन देशी कट्टे आणि काडतुसे पकडली. याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील साबीरखान याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात तीन देशी कट्टे आणि जिवंत काडतुसे येत असल्याची गुप्त माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी पाळत ठेवली असता खामगाव-चिखली रोडवरील किन्ही महादेव फाट्यावर एकजण दुचाकीने संशयास्पद स्थितीत आढळून आला. यावेळी पंचा समक्ष घेतलेल्या त्याच्या अंगझडतीमध्ये व मोटार सायकल एमएच २७ एके १००२ च्या झडतीमध्ये ०३ तीन देशी बनावटीची पिस्टल आणि ०४  जिवंत काडतुसे अशी ४७,०००.०० हजार रुपये किंमतीची अग्नीशस्त्रे आढळून आली. आरोपीने  जिल्हादंडाधिकारी , बुलडाणा २० नोव्हेंबर २०२१ अन्वयेच्या शस्त्रास्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे अवैध अग्निशस्त्रे मोटार सायकलसह एकुण ८७,६०००० रु . चा मुद्देमाल पंचांचे समक्ष जप्त करण्यात आला. तसेच आरोपी  साबिरखान बिसमिल्लाखान , वय 27 वर्षे , रा . बुधवारा , अंजनगाव सुर्जी याचे विरूध्द ३/२५ आर्म अ‍ॅक्ट सहकलम १३५ मपोका प्रमाणे पोलीस नाई गजानन आहेर यांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलीसस्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
 
दुचाकीवरून आणली जात होती शस्त्रे
- अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी तालुक्यातील बुधवारा येथील साबीरखान बिसमिल्लाखान(वय २७) हा एमएच २७ एके १००२ क्रमांकाच्या दुचाकीने तीन देशी कट्टे व काडतुसे अवैधरित्या विक्रीकरण्यासाठी घेऊन येत होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी पाळत ठेऊन त्यास पकडले.

 
यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांचे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी , पो.हे. कॉ . गजानन बोरसे , पोलीस नाईक गजानन आहेर ,  पोलीस नाईक रघुनाथ जाधव ,  पोलीस नाईक संदिप टाकसाळ , धामोडे, पोलीस नाईक श्रीकृष्ण नारखेडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन वाघ, पोलीस नाईक  सुरेश राठोड यांनीही कारवाई केली.  
 

Web Title: In Khamgaon, three indeginious pistols and four live cartridges were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.