खामगाव: सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर दूजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 08:20 PM2020-12-05T20:20:34+5:302020-12-05T20:21:26+5:30
Khamgaon News शेतकºयांना डावलून अडते आणि व्यापाºयांच्या कापसाला खरेदीत प्राधान्य.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: आॅनलाईन आणि आॅफलाईन नोंदणी केलेल्या शेतकºयांना कापूस विक्रीसाठी एकाच वेळी मोबाईल संदेश देण्यात आले. त्यामुळे एकाचवेळी शेतकरी मोठ्याप्रमाणात कापूस विक्रीसाठी आले. दरम्यान, शेतकºयांना डावलून अडते आणि व्यापाºयांच्या कापसाला खरेदीत प्राधान्य दिल्याने, शनिवारी खामगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांनी संताप व्यक्त केला. त्यावेळी पोलिसांना पाचारण करीत परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
भारतीय कापूस निगम लिमिटेडच्या खामगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर आॅनलाईन नोंदणी केलेल्या तसेच आॅफलाइन नोंदणी केलेल्या शेतकºयांना शनिवारी एकाचवेळी कापूस विक्रीसाठी बोलाविण्यात आले. त्यामुळे पणन महासंघाचे कापूस खरेदीचे नियोजन कोलमडले. त्याचवेळी काही खासगी व्यक्ती तसेच व्यापाºयांच्या वाहनांना केंद्रात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या काही शेतकºयांनी यावेळी संताप व्यक्त केला. काही काळ कापूस खरेदी रखडल्याने जनुना रस्त्यावर सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी या रस्त्यावरील वाहतूक जाम झाली. यावेळी सोपान मांडवेकर, बाळकृष्ण सपकाळ भालेगाव, जितेंद्रसिंह तोमर भूषण वाघ रा. बोरजवळा, अशोक सपकाळ आदी शेतकºयांनी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावरील नियोजन कोलमडल्याबाबत रोष व्यक्त केला. यावेळी काही शेतकºयांनी खासगी व्यक्ती तसेच व्यापाºयाच्या वाहनांना आत प्रवेश दिल्याचा आरोपही केला. त्यामुळे या ठिकाणी प्रकरण चांगलेच चिघळले होते.
वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक ठप्प!
खामगाव येथील पणन महासंघाच्या जनुना रोडवरील केंद्रावर कापूस खरेदीचे नियोजन कोलमडल्यामुळे जनुना, जळका तेली, किन्ही महादेव या रस्त्यावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. त्यावेळी शिवाजी नगर पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर सुमारे दीडतासानंतर वाहतूक सुरळीत झाली.