खामगाव : नांदुर्यात ट्रकची दुचाकीला धडक; मुलगा ठार, वडील गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:09 AM2018-01-05T00:09:44+5:302018-01-05T00:19:15+5:30
नांदुरा : राष्ट्रीय महामार्गावर भरधावध ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील मुलाचा मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना ४ जानेवारीच्या रात्री आठ वाजता शहरातील शिवाजी फैलातील रस्त्यावर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : राष्ट्रीय महामार्गावर भरधावध ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील मुलाचा मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना ४ जानेवारीच्या रात्री आठ वाजता शहरातील शिवाजी फैलातील रस्त्यावर घडली.
पाचोरा येथून एमएच १८-८१७७ हा ट्रक अकोल्याकडे माल घेऊन जात होता. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने समोरुन येणा-या दुचाकीला ट्रकची जबर धडक बसली. यात नांदुरा शहरातील कुरेशी नगर भागातील शे.अंसार शे. मालिक हे जखमी झाले, तर त्यांचा दहा वषार्चा मुलगा शेख सोहेल शेख अन्सार हा गंभीर जखमी झाला. उपचारासाठी नेत असतांना त्याची प्राणज्योत मालवली. अपघातात जखमी झालेले शे.अंसार शे. मालिक यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलविण्यात आले आहे. नांदुरा पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पाच वर्षांपूर्वी याचप्रकारे घडला होता अपघात
पाच वर्षांपूर्वी नांदुरा बसस्थानकाजवळ आजोबा आणि नातवाच्या याचप्रकारे घडलेल्या अपघाताच्या स्मृतीना घटनास्थळी जमलेल्यांनी उजाळा दिला. नांदुरा शहरातून जाणार्या महामार्गाला पर्याय म्हणून, गेल्या कित्येक वर्षांपासून बायपासचा प्रश्न रखडलेला आहे आणि त्यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढले असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया यावेळी उमटल्या. नागरिकांनी बसस्थानक चौक, शिवाजी फैल, रेल्वे स्टेशन चौकात किमान गतीरोधक तरी बसवावेत, अशी मागणी अनेकदा केली. मात्र, संबंधित विभागाचे अधिकारी त्याकडे कानाडोळा करित असल्याचे चित्र आहे. राजकीय पदाधिकार्यांनी बायपासचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी जोर धरत आहे.