खामगाव: विहिप, बजरंग दलाची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 01:32 PM2019-07-09T13:32:15+5:302019-07-09T13:32:38+5:30
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने मंगळवारी दुपारी उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
खामगाव: वाढत्या देश विरोधी आणि जिहादी घटनांवर अंकुश लावावा, यामागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने मंगळवारी दुपारी उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उप विभागीय अधिकाºयांमार्फत राष्ट्रपतींना सादर करण्यात आले.
गत काही दिवसांमध्ये देशातील समाज विघातक कृत्यांमध्ये वाढ झाली आहे. हिंदूच्या मंदिरावर तोडफोड केली जात आहे. लहान बालिकांवर अत्याचार आणि जिहादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. गोहत्या आणि गो तस्करीतही वाढ झाली असून देशातील सांस्कृतिक वारशांना जाणिवपूर्वक ठेच पोहोचविली जात आहे. यामुळे सामाजिक स्वास्थ धोक्यात आले असून, या घटनांना वेळीच पायबंद घालणे गरजेचे असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर विहिपचे जिल्हाध्यक्ष बापू खराटे, बजरंग दलाचे अमोल अंधारे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना आणि पदाधिकाºयांच्या स्वाक्षरी आहेत.