खामगाव : वजन, मापे विभागाचे कार्यालय कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:59 PM2020-12-11T16:59:30+5:302020-12-11T16:59:39+5:30
Khamgaon News केवळ कागदोपत्री कारभार चालविला जात असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक बाजारपेठेतील वजन व मापे तपासण्याची जबाबदारी असलेले कार्यालय बाराही महिने कुलूपबंद असल्याने या कार्यालयाचे कामकाज कसे चालत आहे? हा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून उपस्थित होत आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या निरीक्षक वैधमापनशास्त्र (वजने व मापे) कार्यालयाकडे नियमित पेट्रोलपंप तपासणी करणे. शहरातील व्यापार उदिमांमध्ये किंवा उपयोगकर्त्यांकडे असलेल्या वजन व मापांची पडताळणी करणे. त्या वजन मापांवर मुद्रांकन करणे आदी जबाबदारी आहेत. ग्राहकांची वजन व मापांमध्ये होणारी फसवणूक टाळण्याकरिता या विभागाला नेहमीच वॉच ठेवावा लागतो. सध्या पेट्रोलपंपावर मोठ्या प्रमाणात दांडी मारल्या जाते, तसेच बाजारपेठेतही सदोष वजनकाटे असल्याने फसवणूक होत असल्याची ग्राहकांकडून ओरड होत असते. पण, वर्ध्यातील या कार्यालयाकडून वर्षभरात किती कारवाया झाल्या याची माहितीच उपलब्ध नाही.
हे कार्यालय सदैव बंद ठेवून केवळ कागदोपत्री कारभार चालविला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा शहरातील ग्राहकांची फसवणूक आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे ल७ देण्याची गरज आहे.