खामगाव: मार्निंग वॉक करणाऱ्यांकडून गिरविले योगाचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 05:28 PM2020-04-24T17:28:44+5:302020-04-24T17:29:22+5:30

मॉर्निंग वॉक करणाºयांना शहर पोलिस स्टेशन समोर योग करायला लावून अनोखी शिक्षा देण्यात आली.

Khamgaon: Yoga lessons mortgaged by morning walkers! | खामगाव: मार्निंग वॉक करणाऱ्यांकडून गिरविले योगाचे धडे!

खामगाव: मार्निंग वॉक करणाऱ्यांकडून गिरविले योगाचे धडे!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना संचारबंदी काळात शहरातील विविध रस्त्यांवर मॉर्निंग वॉक्साठी बाहेर पडणाºयांना शुक्रवारी शहर पोलिसांनी चांगलाच धडा शिकविला. मॉर्निंग वॉक करणाºयांना शहर पोलिस स्टेशन समोर योग करायला लावून अनोखी शिक्षा देण्यात आली. तर दुचाकीने अकारण फिरणाºयांवर १७५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. खामगाव शहरातही कोरोना संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाइी खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना दुचाकी वाहने वापरण्यास  मनाई करण्यात आली आहे. मात्र, तरी देखील शहरात दुचाकींचा वापर थांबत नसल्याने संचारबंदी काळात दररोज नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. कोरोना संचारबंदी लागू झाल्यापासून शुक्रवार २४ एप्रिलपर्यंत शहर आणि परिसरातील १२३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात अकारण फिरणाºयांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मदत होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, यावेळी योग्य कारण सांगणाºयांना तसेच शेतकºयांना कारवाईतून वगळण्यात आले.

अनेकांनी गिरविले योगाचे धडे!
संचारबंदी काळात मॉर्निग वॉक करताना आढळून आलेल्यांना शहर पोलिस स्टेशनमध्ये स्थानबध्द करण्यात आले. शहराच्या विविध भागातील नागरिकांचा यामध्ये समावेश असल्याने पोलिस स्टेशनच्या आवारात एकच गर्दी झाली. त्यामुळे या नागरिकांना सोशल डिस्टसिंगचे पालन करीत शहर पोलिस स्टेशन समोर रांगेत बसविण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून योगाचे धडे गिरविण्यात आले. यावेळी अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना!
सकाळी ८ ते १२ या वेळेत शहरातील नांदुरा रोडवर तसेच विविध चौकात नागरिकांची गर्दी होते. नागरिक एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याने सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडतो. वाढत्या गर्दीबाबत येत असलेल्या तक्रारींमुळे शुक्रवारी शहर पोलिसांनी कारवाईचा फास आवळला.

वारंवार सूचना देऊनही काहीजण संचारबंदी काळात बाहेर फिरताना आढळून येत आहेत. काही जण मॉर्निंग वॉकसाठीही बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शुक्रवारी तब्बल १७५ जणांवर कारवाई करण्यात आली.
- सुनिल अंबुलकर
पोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन, खामगाव.

Web Title: Khamgaon: Yoga lessons mortgaged by morning walkers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.