खामगावकरांना पाण्याची प्रतीक्षा कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 04:12 PM2019-02-27T16:12:18+5:302019-02-27T16:12:22+5:30
खामगाव : पाईपलाईन दुरूस्तीचा तांत्रिक पेच न सुटू शकल्याने, बुधवारी सायंकाळपर्यंत खामगाव शहराचा पाणी पुरवठा असुरळीत होता. परिणामी, तब्बल १५ दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा ठप्प असून, खामगावकरांची पाण्याची प्रतीक्षा कायम असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पाईपलाईन दुरूस्तीचा तांत्रिक पेच न सुटू शकल्याने, बुधवारी सायंकाळपर्यंत खामगाव शहराचा पाणी पुरवठा असुरळीत होता. परिणामी, तब्बल १५ दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा ठप्प असून, खामगावकरांची पाण्याची प्रतीक्षा कायम असल्याचे दिसून येते. पाईपलाईनची तांत्रिक दुरूस्ती लांबणीवर पडल्याने आता गुरूवारी सायंकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
खामगाव शहराला पाणी पुरवठा करणाºया गुरूत्त्व वाहिनीवरील गळती दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून खामगाव शहरात पाण्याचा ठणठणाट असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासोबतच वापराचेही पाणी विकत घ्यावे लागत आहे. दरम्यान, मंगळवारी दुरूस्ती पूर्णत्वास आल्यानंतर पाईपलाईनवरील एक जोड पुन्हा निसटला. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि पालिकेने तातडीने हा जोड दुरूस्तीचे काम पूर्णत्वास नेले. सारोळा शिवारातील नदीपात्रातील जोड दुरूस्तीपूर्णत्वास आली. मात्र, सिमेंटीकरणामुळे तसेच तांत्रिक तपासणीमुळे बुधवारी खामगाव शहराला पाणी पुरवठा होवू शकला नाही.
नागरिकांमध्ये तीव्र संताप!
विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील अनेक भागात तब्बल तीन आठवड्यांपासून पाणी पुरवठा असुरळीत आहे. त्या भागात नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. पाणी पुरवठा लांबणीवर पडल्यामुळे नागरिकांवरील आर्थिक भुर्दंड वाढत आहे.
गळती दुरूस्तीचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. पाईपलाईनची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे. गुरुवारी सायंकाळपासून शहरात नियोजनानुसार पाणी पुरवठा सुरळीत केल्या जाईल. ज्या भागात ब्रेकडाऊन झाला होता. तेथूनच पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल.
- प्राजक्ता पांडे, पाणी पुरवठा अभियंता, नगर परिषद, खामगाव.