खामगावची कन्या ठरली 'इंडिया फेस ऑफ वेस्ट'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 12:39 PM2021-08-17T12:39:08+5:302021-08-17T12:39:33+5:30
Khamgaon's daughter become 'India Face of West' : सध्या मुंबई येथे राहणाऱ्या अल्फा मनोज शाह यांनी दोन टायल क्राॅउन जिंकले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खामगाव माहेर असलेल्या सध्या मुंबई येथे राहणाऱ्या अल्फा मनोज शाह यांनी दोन टायल क्राॅउन जिंकले आहेत. त्यामध्ये मिस काँन्जेनिअलिटी आणि मिस इंडिया फेस ऑफ वेस्ट ( कम्प्लिट वेस्टर्न इंडिया) या किताबाचा समावेश आहे.
गेल्या आठवड्यात ८ ऑगस्ट रोजी गुडगाव येथे ही स्पर्धा पार पडली. मिस इंडिया क्वीन आँफ सबस्टॅन्सच्या वतीने ही सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये खामगाव येथील सेठ सूर्यकांत सेलारका व कुसुम सेलारका यांची धाकटी कन्या अल्फा यांनी सहभाग घेतला. सध्या त्या मुंबई येथे वास्तव्यास आहेत.
या स्पर्धेत पहिल्या १६ मध्ये त्यांनी स्थान पटकावले. त्यानंतर पहिल्या पाचमध्येही त्यांची निवड झाली. अल्फा यांनी दोन टायटल क्राऊन जिंकले.
मिस काॅन्जेनिअलिटी (मनमिळाऊ आणि मदत करणाऱ्या), तसेच मिस इंडिया फेस ऑफ वेस्ट (कंम्प्लिट वेस्टर्न इंडिया) या किताबाचा त्यामध्ये समावेश आहे.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय सासरच्या कुटुंबासह माता-पित्यांना दिले आहे. अल्फा यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अल्फा यांनी आपले विचार चांगले आणि सत्य असतील तर यश मिळतेच, स्वत:वर विश्वास ठेवा आणि पुढे चला, असे अल्फा शाह यांनी सांगितले.