खामगावातील आॅटो चालकांची धरपकड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:48 PM2018-05-30T13:48:55+5:302018-05-30T13:48:55+5:30
खामगाव: शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून शहर पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या विविध मोहिमेतंर्गत बुधवारी आॅटो चालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
खामगाव: शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून शहर पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या विविध मोहिमेतंर्गत बुधवारी आॅटो चालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे आॅटो चालकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
शहर पोलिस आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बुधवारी मुख्य रस्त्यावर तसेच विविध चौकात आॅटोची कागदपत्र तपासणी मोहिम राबविण्यात आली. तपासणी दरम्यान, कागदपत्र नसलेले २३ आॅटो शहर पोलिस स्टेशनमध्ये लावण्यात आले. यापैकी बहुतांश आॅटो चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक शशीकुमार मिना, अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष टाले यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये वाहतूक शाखेचे एएसआय अरविंद राऊत, मार्गरेट हंस, वाहतूक पोलिस योगेश चोपडे, संजय इंगळे, हागे, टेकाळे, नागरे यांनी ही कारवाई केली.
कारवाईमुळे आॅटो चालकांमध्ये धास्ती!
शहराच्या विविध भागात ही कारवाई सुरू असताना बस स्थानक चौकातील आॅटो धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे अनेक आॅटो चालकांनी आपली वाहने रस्त्यावर न आणणेच पसंत केल्याचे चित्र दुपाºयाच्या वेळी दिसून आले. शहर पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट, अल्पवयीन वाहन चालकांसोबतच विना परवाना वाहन चालविणाºयांविरोधात मोहिम उघडली आहे. या मोहिमेतंर्गत बुधवारी आॅटो चालकांवर कारवाई करण्यात आली.
शहरातील वाहतुकीला वळण लावण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये बेशिस्त वाहन धारकांवर कारवाई केली जात आहे. बुधवारी या मोहिमेत आॅटो चालकांवर कारवाई करण्यात आली.
- संतोष टाले, पोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन, खामगाव.