खरबडी सरपंचावरील अविश्‍वास ठराव पारित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2016 02:27 AM2016-03-17T02:27:34+5:302016-03-17T02:27:34+5:30

मातोळा तालुक्यातील घटना; ग्रामपंचायतच्या सातही सदस्यांनी हात उंचावून ठरावास पाठिंबा दर्शविला.

Kharbadi passed the unbelief resolution on the Sarpanch! | खरबडी सरपंचावरील अविश्‍वास ठराव पारित!

खरबडी सरपंचावरील अविश्‍वास ठराव पारित!

Next

मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यातील खरबडी ग्रामपंचायतीचे सरपंच मनिषा योगेश नाफडे यांच्याविरुद्धचा अविश्‍वास ठराव १६ मार्च रोजी पारित झाला. तहसीलदार रूपेश खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सात सदस्यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर दोन सदस्य गैरहजर राहिले. यावेळी बैठकीस सात सदस्य हजर होते. सरपंच मनिषा योगेश नाफडे यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव मांडल्यानंतर या सातही सदस्यांनी हात उंचावून ठरावास पाठिंबा दर्शविला. त्यामुळे तहसीलदारांनीही हा ठराव मंजूर केला. हात उंचावणार्‍यांमध्ये उपसरपंच नवलसिंग सोळंके, मयूर किनगे, वंदना किनगे, मंदाकिनी राणे, पुंडलिक वाकोडे, उषाबाई निकाळजे आणि प्रफुल्ल ज्ञानदेव किनगे यांचा समावेश होता, तर अविश्‍वास ठरावावेळी सरपंच मनिषा नाफडे व भाग्यङ्म्री नाफडे हे सदस्य गैरहजर होते. बैठकीस ग्रामसेवक छाया बशिरे, तलाठी नवले यांची उपस्थिती होती.

Web Title: Kharbadi passed the unbelief resolution on the Sarpanch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.