५४ हजार हेक्टरवर होणार खरीप पेरणी

By admin | Published: May 22, 2017 12:31 AM2017-05-22T00:31:15+5:302017-05-22T00:31:15+5:30

खरीप पीक पेरणी नियोजन : गतवर्षीच्या तुलनेत १ हजार १५२ हेक्टरने वाढ

Kharif sowing will be on 54 thousand hectares | ५४ हजार हेक्टरवर होणार खरीप पेरणी

५४ हजार हेक्टरवर होणार खरीप पेरणी

Next



किशोर मापारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : तालुका कृषि कार्यालयाने तालुक्यातील खरीप पिक पेरणीचे नियोजन केले असून २०१७ च्या खरीप पिकासाठी एकूण ५४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यंदाच्या खरीप हंगाम पिकाच्या क्षेत्रात १ हजार १५२ हेक्टर ने वाढ झाली आहे. नियोजनानुसार ज्वारी ५०० हेक्टर, तूर १०००० हेक्टर, मुग २००० हेक्टर, उडीद १५०० हेक्टर, सोयाबीन ३८००० हेक्टर, कपाशी २००० हेक्टर, इतर ५०० असे एकूण ५४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिक पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.
यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्यामुळे खरीप हंगामात शेतकरी मोठ्या संख्येने पेरणी करणार आहे. पिक कर्ज मंजुरी झाल्यास लवकरच शेतात खरीप हंगामाच्या पेरणीचे काम चालू होणार आहे. यावर्षी सोयाबीन, तूर व इतर काही पेरणी क्षेत्र नियोजनामध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. खरीप हंगाम पेरणीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांच्या बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे बियाणे व खतांची कमतरता पडणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. बियाणे व खतांचे राज्य स्तरावरच प्रभावी नियोजन असल्यामुळे शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची कमतरता भासणार नाही, अशी माहिती तालुका कृषि अधिकारी गणेश गिरी यांनी दिली आहे. सन २०१६ मध्ये ५३ हजार ३४८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिक पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. यंदाच्या खरीप हंगाम पिकाच्या क्षेत्रात १ हजार १५२ हेक्टरने वाढ करण्यात आली आहे. नियोजनानुसार ज्वारीचे २४८ हेक्टर वरून ५०० हेक्टर वर वाढ करण्यात आली आहे. तूरी चाही पेरा ९ हजार ५४६ हेक्टर वरून १०००० हेक्टर वाढला आहे. मुंग १ हजार ९४२ हेक्टर वरून २००० हेक्टर पेरण्यात येणार आहे. २०१६ मध्ये उडीदचे पेरणी क्षेत्र १ हजार ९१९ हेक्टर होते. मात्र यावर्षी उडीदचे ४१९ हेक्टर पेरणी क्षेत्र घटून १ हजार ५०० हेक्टर करण्यात आले आहे. सोयाबीनच्या पेरणीत वाढ होऊन ३७ हजार ७३६ हेक्टर वरून ३८००० हेक्टर झाले आहे. कपाशी १ हजार १४६ हेक्टर वरून २००० हेक्टर करण्यात आले आहे. इतर ५०० असे एकूण ५४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिक पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी पावसाने बऱ्यापैकी साथ दिल्याने तालुक्यात सोयाबीन, तुर, कपाशी व अन्य खरीपाच्या पिकाला चांगली झडती मिळाली. उत्पन्न चांगले वाढले. मात्र शेतकऱ्यांच्या या मालाला यावर्षी चांगला भाव न मिळाल्याने शेतकरी चांगलाच मेटाकूटीला आला. सध्या शेतकाऱ्यांना यावर्षीच्या पेरणीचे नियोजन करयाचे आहे. बँकांनी वेळेच्या आत कर्ज पुरवठा केला तर बळीराजा सुध्दा वेळेवर पेरणी करेल अन्यथा पुन्हा शेतकऱ्यांची फरफट आहेच.

भुईमुगाच्या लागवडीत घट
लोणार तालुक्यात सोयाबीन हेच प्रमुख पीक असून दरवर्षी तुरीच्या पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे. याशिवाय तालुक्यात खरिपात बाजरी, ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूगाचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच कृषी विकास अधिकारी सह प्रत्येक चार तालुक्यांत एक या प्रमाणे एकूण सहा भरारी पथके आहेत.

Web Title: Kharif sowing will be on 54 thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.