बुलडाणा जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:09 PM2019-07-10T12:09:52+5:302019-07-10T12:19:52+5:30

आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९६ हजार ४४९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

 Kharif sown over five lakh hectare in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी

बुलडाणा जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत ६६.३० टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या आहेत. सात लाख ४८ हजार ८०० हेक्टरवर पेण्यांचे नियोजन केले आहे. चार लाख ९६ हजार ४४१ हेक्टवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९६ हजार ४४९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सात लाख ४८ हजार ८०० हेक्टरवर कृषी विभागाचे पेरण्याचे नियोजन असून आतापर्यंत ६६.३० टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या आहेत. दरम्यान, बुलडाणा तालुक्यात पावसाचा जोर सातत्यपूर्ण असल्याने या तालुक्यातील जवळपास २८ टक्के पेरण्या पावसामुळे रखडल्याचे चित्र आहे.
कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात सात लाख ४८ हजार ८०० हेक्टरवर पेण्यांचे नियोजन केले आहे. त्यानुषंगाने विचार करता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चार लाख ९६ हजार ४४१ हेक्टवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे. यात प्रामुख्याने कापसाचा पेरा हा एक लाख ४६ हजार ४१३ हेक्टरवर झाला असून सोयाबीनचा पेरा दोन लाख ४९ हजार ४०२ हेक्टरवर झाला आहे. एकुण सरासरी क्षेत्राच्या ३३.३० टक्के हा पेरा झाला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन व कपाशीच्या पेºयाकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.
दुसरीकडे जिल्ह्यात जून महिन्यात तब्बल २० ते २२ दिवस पावसाने ओढ दिली होती. दुष्काळी स्थितीत ही स्थिती अधिकच दाहकता निर्माण करणारी होती. मात्र त्यानंतर २३ जून पासून जिल्ह्यात पावसाने संततधार हजेरी लावली. परिणामी प्रारंभी शेतकºयांना पेरण्या करणेही अवघड झाले होते. त्यातच बुलडाणा तालुक्यातील धाड, देऊळघाट, सागवन, कोलवड, तांदुळवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे नुकसान झाले होते. त्यातच या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने अद्यापही बुलडाणा तालुक्यातील २८ टक्के क्षेत्रावरील पेरण्या मात्र रखडलेल्या आहेत. त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यास या तालुक्यात राहिलेल्या पेरण्या पूर्ण होऊ शकतात.
 


बुलडाण्याची पावसाचीसरासरी ४९ टक्के
४बुलडाणा तालुक्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४९ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यात दररोज संततधार पावसाची हजेरी लागत असल्याने जवळपास २८ टक्के पेरण्या त्यामुळे रखडल्या आहेत. बुलडाणा तालुक्यात सरासरी ७५ हजार ५०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केलेले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५४ हजार ३८८ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३२ टक्के पाऊस पडला आहे.

७५ हजार हेक्टरवर कडधान्याचा पेरा
जिल्ह्यात दोन लाख ८७ हजार ६०५ हेक्टरवर कडधान्य पेºयाचे नियोजन कृषी विभागाने केले होते. त्यापैकी आतापर्यंत ९९ हजार ५०५ हेक्टरवर कडधान्याचा पेरा झाला आहे. यात ४९ हजार ७०८ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला असून उडीदाचा पेरा हा ११ हजार ७२६ हेक्टरवर झालेला आहे. दरम्यान तेलबियांचा पेरा हा दोन लाख ५० हजार ४२३ हेक्टरवर करण्यात आलेला आहे.

Web Title:  Kharif sown over five lakh hectare in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.