बुद्ध जयंतीनिमित्त रुग्णांच्या नातेवाइकांना खीरपुरीचे भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:52+5:302021-05-28T04:25:52+5:30
बुलडाणा : तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही धम्मबांधव परिवाराच्या वतीने कोविड रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाइकांना खीरपुरीचे भोजन देण्यात ...
बुलडाणा : तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही धम्मबांधव परिवाराच्या वतीने कोविड रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाइकांना खीरपुरीचे भोजन देण्यात आले. आम्ही धम्मबांधव परिवाराच्या वतीने दररोज कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत जेवणाचे डबे पुरविण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. १२ मे पासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास दाेन हजारांपेक्षा अधिक डबे गरजू लोकांना पोहोचवण्यात आले आहे.
२६ मे रोजी भगवान बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्ताने रुग्णांच्या नातेवाइकांना विशेष मेनू म्हणून शिरापुरी व खिरीच्या ५०० डब्यांचे वाटप करण्यात आले. तसेच गरीब कुटुंबांच्या सदस्यांना ५० धान्यकिटवाटप करण्यात आले. जोपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही व जोपर्यंत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना जेवणाची आवश्यकता आहे, तोपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. बुद्ध जयंतीनिमित्त खीरपुरीचे डबेवाटप प्रसंगी कुणाल पैठणकर, पत्रकार सिद्धार्थ आराख, डीवायएसपी मोनिका साळवे, राजेश टारपे, नंदिनी टारपे, शैलेश खेडकर, भिकाजी मेढे, आत्माराम चौथमोल, प्रकाश पवार, प्रल्हाद कांबळे, प्रा. प्रदीप जाधव, विनोद इंगळे हे उपस्थित होते. या उपक्रमासाठी आम्ही धम्मबांधव परिवाराचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.