तुरीच्या चुकार्‍यासाठी युकाँचा खविसं कार्यालयात ठिय्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:18 AM2017-10-12T00:18:01+5:302017-10-12T00:18:06+5:30

चिखली : ऐन दिवाळी सणालाही शेतकर्‍यांनी विक्री केलेल्या तुरीचे चुकारे मिळत नसल्याने आ. राहुल बोंद्रे यांनी शेतकर्‍यांसमवेत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करून शेतकर्‍यांना तातडीने चुकारे देण्यासह शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे बेकायदेशीररीत्या दुसरीकडे वर्ग करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

Khuissin stuck at the office for the kiss! | तुरीच्या चुकार्‍यासाठी युकाँचा खविसं कार्यालयात ठिय्या!

तुरीच्या चुकार्‍यासाठी युकाँचा खविसं कार्यालयात ठिय्या!

Next
ठळक मुद्देपैसे वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करा - राहुल बोंद्रे

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : ऐन दिवाळी सणालाही शेतकर्‍यांनी विक्री केलेल्या तुरीचे चुकारे मिळत नसल्याने आ. राहुल बोंद्रे यांनी शेतकर्‍यांसमवेत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करून शेतकर्‍यांना तातडीने चुकारे देण्यासह शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे बेकायदेशीररीत्या दुसरीकडे वर्ग करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यासंदर्भात खरेदी-विक्री संस्थेमध्ये तालुका युवक काँग्रेसने ११ ऑक्टोबर रोजी ठिय्या आंदोलन करून दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
शेतकर्‍यांनी प्रचंड त्रास सोसून नाफेडला आपली तूर विकली आहे; मात्र आता तुरीचे दुसरे पीक येऊनही शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले नाहीत. ३१ मे २0१७ पूर्वी तूर विकलेल्या शेतकर्‍यांचे चुकारे अद्यापही बाकी असताना खरेदी केलेल्या तुरीचे पैसे जिल्हा मार्केटींग अधिकारी बुलडाणा यांनी चिखली तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्था यांना पाठविल्यानंतरही ते पैसे परस्पर इतर ठिकाणी वर्ग करून तुरीच्या चुकार्‍यांपासून शेतकर्‍यांना वंचित ठेवण्याचा प्रकार या संस्थेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकाने केल्याचा आरोप करून युवक काँग्रेसने ११ ऑक्टोबर रोजी खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात ठिय्या मांडला होता. दरम्यान, जिल्हा मार्केटींग अधिकार्‍यांशी संपर्क साधून लवकरात लवकर तुरीचे चुकारे देण्यात यावे, अशी मागणी केली असता, चिखली खरेदी-विक्री संस्थेस तुरीच्या चुकार्‍याची रक्कम पूर्वीच पाठविल्याची बाब स्पष्ट झाली. खविसंने तुरीच्या चुकार्‍यासाठी आलेली रक्कम इतर देणी चुकविण्यासाठी वळती केल्याची बाब समोर आली असून, सुमारे २९ लाखापेक्षा अधिक रक्कम परस्पर इतरत्र वापरल्या गेली असल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली. ही बाब आ.राहुल बोंद्रे यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देत या बेकायदेशीर प्रकाराची चौकशी करून शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे इतरत्र वर्ग करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी व शेतकर्‍यांना तुरीचे चुकारे देण्याची मागणी केली. तर ठिय्या आंदोलनात युकाँ अध्यक्ष रमेश सुरडकर, संजय गिरी, शरद कदम, बाळु साळोख, संजय कोल्हे, भास्कर काकडे, राजू सुरडकर, पिंटु गायकवाड, संजय सोळंकी, ज्ञानेश्‍वर सोळंके, भाऊसाहेब कदम, ज्ञानेश्‍वर गायकवाड, राजेंद्र साळोख, कैलास सुरडकर, किशोर साळवे, राजू सावंत आदींचा सहभाग होता.  

Web Title: Khuissin stuck at the office for the kiss!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.