खुटन गँगने पाचोरा, जळगाव जामोदमध्येही टाकला होता दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:46 AM2021-02-27T04:46:57+5:302021-02-27T04:46:57+5:30
साकेगाव येथील रमेश भगवान लोखंडे हे घरी पायी जात असताना त्यांना गणेश निम्मन खुटन व त्याच्या चार साथीदारांनी अडवून ...
साकेगाव येथील रमेश भगवान लोखंडे हे घरी पायी जात असताना त्यांना गणेश निम्मन खुटन व त्याच्या चार साथीदारांनी अडवून मारहाण केली होती. त्याच्याकडून ४८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तसेच साकेगाव येथे दोन ठिकाणी त्यांनी घरफोडीही केली होती. प्रकरणात दोन वर्षापासून तो फरार होता. त्यास पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलिस अधिक्षक बजरंग बनसोडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती.
--आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता--
गणेश निम्मन खुटन पोलिसांच्या हाती लागल्यामुळे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे. प्रामुख्याने जालना, जळगाव, परभणी आणि बुलडाणा जिल्ह्यात खुटनने सहकाऱ्यासह काही गंभीर गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात सजन कुंडलिक इंगळे (४५, रा. भानखेड) यास एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीत खुटनचे नाव समोर आले होते. तो धागा पकडून सापळा रचत खुटनला अटक करण्यात आली होती.