लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 11:07 IST2021-02-28T11:06:54+5:302021-02-28T11:07:04+5:30
Crime News ६ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यातून महेश व गणेश नामक दोन्ही युवक हे अल्पवयीन मुलीच्या गावी आले.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळविले
लोकमत न्यूज नेटवर्क
अंढेरा : लग्नाचे आमिष दाखवून चिखली तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस दोन जणांनी पळवून नेल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. प्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी महेश व गणेश नामक दोन जणांविरोधात शुक्रवारी रात्री अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारकर्ती महिला ही पुणे जिल्ह्यात मधल्या काळात कुटुंबासह कामानिमित्त गेली होती. तेथे महेश व गणेश नामक युवकांशी त्यांची ओळख झाली होती. दरम्यान, मधल्या काळात संबंधित महिला ही कुटुंबासह गावाकडे आली होती. २६ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यातून महेश व गणेश नामक दोन्ही युवक हे अल्पवयीन मुलीच्या गावी आले. तसेच मुलीच्या कुटुंबीयांकडे आले व मुलीला लग्नाची मागणी घातली. मात्र मुलीच्या आईने त्यांना लग्नासाठी नकार दिला. तेव्हा पैसे देण्याचेही त्यांनी आमिष दाखवले. मात्र त्यास नकार दिल्यानंतर दोन्ही आरोपींनी अल्पवयीन मुलीस गांगलगाव येथून पळवून नेले.
या प्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार साहाय्यक पोलीस निरीक्षक राजवंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्ती पोफळे हे करीत आहेत. पोलिसांचे एक पथकही तपासणी रवाना झाले असल्याची माहिती आहे.