किडनी आजाराने इसमाचा मृत्यू
By admin | Published: April 16, 2015 01:10 AM2015-04-16T01:10:04+5:302015-04-16T01:10:04+5:30
दीड महिन्यात दहा जणांचे किडनीच्या आजाराने मृत्यू.
सोनाळा (जि. बुलडाणा): येथील पोलीस चौकीजवळील रहिवासी जगन्नाथ तुळशीराम सुलताने (५0) यांचे किडनीच्या आजाराने १२ एप्रिल रोजी निधन झाले. सोनाळा परिसरात किडनी आजाराने मृत्यूचे तांडव सुरू असून, जवळपास दीड महिन्यात दहा जणांचे किडनीच्या आजाराने मृत्यू झाले. जगन्नाथ सुलताने यांच्या पश्चात मुलगी, विवाहित दोन मुले, पत्नी, म्हातारी आई आहे. त्यांना अकोला, बुलडाणा येथे उ पचारासाठी नेण्यात आले होते. परंतु, किडनी निकामी झाल्याने मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तीन वर्षांंपूर्वी त्यांच्या मोठय़ा भावाचासुद्धा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला. या भागात क्षाराचे प्रमाण जास्त असल्यामुळे किडनी निकामी होण्याचे प्रमाण जास्त आहे. हा भाग खारपाणपट्यात येत असल्यामुळे या भागात किडनीरुग्णांचे जास्त प्रमाण आहे व दिवसेंदिवस मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शासनाने याबाबत काही उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात या भागात मृत्यूचे तांडव झाल्याशिवाय राहणार नाही, एवढे मात्र खरे.