पहिल्या दिवशी मुलांचा ऑनलाइन किलबिलाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:39+5:302021-06-29T04:23:39+5:30
आदिवासी बहुल गावात पोहोचले अधिकारी शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण विभागाचे अधिकारी अनेक शाळांना भेट देतात, परंतु यंदा ऑनलाइन शिक्षण ...
आदिवासी बहुल गावात पोहोचले अधिकारी
शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण विभागाचे अधिकारी अनेक शाळांना भेट देतात, परंतु यंदा ऑनलाइन शिक्षण असल्याने शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी जळगाव जामोद तालुक्यातील चारबन या आदिवासी बहुल गावात जाऊन शाळेला भेट दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा ऑनलाइन शाळा प्रवेशोत्सव पार पडला, तर प्राथमिक स्तरावर काही मोजक्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांचे स्वागतही करण्यात आले.
मॅडम मला बोलायचे...
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष मुलांना बोलते केले. त्यांच्याशी गप्पा मारल्या. यावेळी मुलांनीही मॅडम मला बोलायचे... असे म्हणून शाळेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला.
प्रवेशोत्सव साजरा
शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या उपस्थितीत चारबन येथे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा व्यवस्थापन समिती व काही विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गट शिक्षणाधिकारी फाळके, शिक्षण विस्तार अधिकारी रा.पा. तायडे, केंद्रप्रमुख के.जी. राऊत, शिक्षक दांडगे, दीपक उमाळे, एम.जी. मोसंबे, ममता बावित, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुलाबसिंग सस्त्या, कमिस चंगळ, उदयसिंग सस्त्या, थापासिंग पटेल, प्रकाश धुर्डे, शमीम देशमुख आदी उपस्थित होते.