प्राणघातक हल्ल्यात युवक ठार

By admin | Published: March 22, 2016 02:30 AM2016-03-22T02:30:03+5:302016-03-22T02:30:03+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील घटना; पाळत ठेवून केला हल्ला; सहा आरोपींना अटक.

Kill the youth in a deadly attack | प्राणघातक हल्ल्यात युवक ठार

प्राणघातक हल्ल्यात युवक ठार

Next

सिंदखेड राजा(जि. बुलडाणा) : तालुक्यातील वर्दडी बु. येथील २२ वर्षीय युवकास सहा व्यक्तींनी रात्री १0 वाजता रस्त्यात अडवून लोखंडी रॉड आणि दगडाने प्राणघातक हल्ला करुन ठार मारले. उपरोक्त घटना ही वर्दडी बु. येथे २0 मार्चच्या रात्री १0 वाजता घडली. किनगाव राजा पोलिसांनी या घटनेतील सहा आरोपींना अटक केली आहे.
वर्दडी बु. येथील मृतक रामेश्‍वर अशोक शिंदे (वय २२) हा २0 मार्चला रात्री काका कांताराम शिंदे यांच्या शेतात गेला होता. शेतात जेवण केल्यानंतर रामेश्‍वर रात्री घराकडे परत येत असताना रस्त्यात त्याच्यावर पाळत ठेवून सहा युवक बसले होते. रामेश्‍वर रस्त्याने येताना दिसताच त्याला अडवून ह्यतू साळवे यांच्या मुलीसोबत का बोलतो, तिचे आणि तुझे काय संबंधह्ण असा वाद घालून त्याच्या डोक्यात, हाता-पायावर लोखंडी रॉडने व दगडाने जबर मारले. त्यातच रामेश्‍वर हा गंभीर जखमी झाल्याने रस्त्यातच बेशुद्ध अवस्थेत पडला. सकाळी शेतातून परत येणार्‍या व्यक्तींना रामेश्‍वर रक्ताच्या थारोळ्यात दिसला. त्याला तातडीने खासगी डॉक्टरांकडे आणले. तो गंभीर अवस्थेत असल्याने तातडीने जालना येथे हलविण्याचे सांगितले. किनगाव राजापर्यंत नेत असताना सकाळी ८ ते ९ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. ज्यावेळी त्याच्यावर हल्ला झाला त्यावेळी काही नातेवाइकांना आरोपींची नावे सांगितली. मृत्युसमयी त्याने जबाब दिला. मृतकाचा चुलतभाऊ योगेश बबन शिंदे यांच्या तक्रारीवरुन किनगाव राजा पोलिसांनी आरोपी मंगेश सुरेश सोनकांबळे, स्वप्निल श्यामराव सोनकांबळे, नितीन दिलीप सोनकांबळे, विद्याधर श्यामसुंदर सोनकांबळे, हर्षद सोनकांबळे, बाळू कारभारी साळवे या सहा आरोपींना कलम ३0२, ३४१, १४३, १४७, १४८, १४९ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजू नागलोत करीत आहेत.

Web Title: Kill the youth in a deadly attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.