अपहरणाच्या अफवेने पोलिसांची धावपळ; नांदुऱ्यात सापडला गायब झालेला विद्यार्थी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:58 PM2018-07-17T14:58:22+5:302018-07-17T14:59:47+5:30

विद्यार्थ्यांच्या डोक्यात थैली टाकून त्याचे अपहरण करण्यात आल्याची  अफवा सोमवारी सायंकाळी शहरात वाºयासारखी पसरली. या गोष्टीची शहनिशा करण्यासाठी पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागली.

kinnaping rumors; Disappeared student found in Nandura | अपहरणाच्या अफवेने पोलिसांची धावपळ; नांदुऱ्यात सापडला गायब झालेला विद्यार्थी 

अपहरणाच्या अफवेने पोलिसांची धावपळ; नांदुऱ्यात सापडला गायब झालेला विद्यार्थी 

Next
ठळक मुद्देगौरव सुधीर एकडे या विद्यार्थ्याचे भगतसिंह चौकातून अपहरण झाल्याची जोरदार चर्चा शहरात पसरली होती. दिवसाढवळ्या अपहरण झाल्याच्या चर्चेमुळे पोलिसांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अखेर सायंकाळी गौरव नांदुरा येथे मावशीकडे गेल्याचे समजले. त्यावेळी सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: शहरातील एका शाळेत दहावीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात थैली टाकून त्याचे अपहरण करण्यात आल्याची  अफवा सोमवारी सायंकाळी शहरात वाºयासारखी पसरली. या गोष्टीची शहनिशा करण्यासाठी पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागली. सोशल मिडीयावरही मॅसेज व्हॉयरल झाल्याने, पोलिस प्रशासन चांगलेच जेरीस आले असताना, अखेर सायंकाळी   हा मुलगा  नांदुरा येथे सापडल्याची वार्ता धडकली आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.

शहरातील नॅशनल हायस्कूल मधील गौरव सुधीर एकडे या विद्यार्थ्याचे भगतसिंह चौकातून अपहरण झाल्याची जोरदार चर्चा शहरात पसरली होती. शाळेतून निघालेला गौरव हा आपली सायकल रस्त्याच्या कडेला ठेवून विरूध्द दिशेने पळत सुटला होता. शाळा सुटल्यानंतर बºयाच कालावधी उलटल्यानंतरही गौरव घरी परतला नसल्याने आई-वडिलांनी त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी त्याची सायकल रस्त्यावर बेवारस अवस्थेत आढळून आली. या मुलाला डोक्यात थैली टाकून गाडीतून नेण्यात आले. थोडक्यात गौरवचे अपहरण झाल्याची अफवा वाºयासारखी शहरात पसरली. दिवसाढवळ्या अपहरण झाल्याच्या चर्चेमुळे पोलिसांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी लागलीच घटनेच्या शहनिशेसाठी प्रयत्न चालविले. घटनास्थळावरील अनेकांचे बयाण नोंदविण्यासोबतच सीसी फुटेजही पोलिसांनी तपासले. अशी कुठलिही घटना घडली नसल्याचे उजेडात आल्यानंतर पोलिसांनी त्याचा नातेवाईकांकडे शोध घेण्याचे सुचविले. अखेर सायंकाळी गौरव नांदुरा येथे मावशीकडे गेल्याचे समजले. त्यावेळी सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला.

चार तास चालला अपहरण नाट्याचा थरार!

दिवसाढवळ्या अपहरण झाल्याच्या अफवेमुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. त्यामुळे पोलिसांनी या घटनेला अतिशय गांभीर्यतेने घेत, घटनेचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला. ही अफवा वाºयासारखी पसरल्यामुळे दरम्यानच्या काळात पोलिसांना घटनेच्या शहनिशेसाठी अनेक फोन आलेत. मात्र, शेवटी ‘खोदा पहाड...निकला चूहा’ या म्हणी प्रमाणे अपहरण नाट्य ही एक अफवाच ठरली. 

Web Title: kinnaping rumors; Disappeared student found in Nandura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.