तेल्हारा ग्रामपंचायत सरपंचपदी किरण गाडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:32 AM2021-02-12T04:32:46+5:302021-02-12T04:32:46+5:30
तालुक्यातील तेल्हारा येथील सात सदस्यीय ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. या निवडणुकीत संजय गाडेकर यांच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या सहा ...
तालुक्यातील तेल्हारा येथील सात सदस्यीय ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. या निवडणुकीत संजय गाडेकर यांच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या सहा जागा निवडून आल्या. यामध्ये संजय गाडेकर यांच्या पत्नी किरण गाडेकर यांनी सलग तिसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येत विजयाची 'हॅट्रिक' साधली आहे. तेल्हारा हे गाव पैनगंगा पूरपिडीत आहे. येथील ग्रामस्थांनी स्वेच्छा पूनर्वसन केलेले असून नवीन गावठाणमध्ये ेस्थस्लांतरित झालेले आहे. मात्र, नवीन गावठाणात अनेक नागरी सोयी-सुविधांची आवश्यकता आहे. यापृष्ठभूमीवर या गावच्या सरपंचपदाच्या निवडीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. संजय गाडेकर यांची ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याशी असलेली जवळीक पाहता ग्रामस्थांनी संजय गाडेकर यांच्या पॅनलच्या हाती एकहाती सत्ता सोपविली होती. सोबतच सरपंचपदी देखील किरण गाडेकर यांची अविरोध निवड करून ग्रामहिताचा निर्णय घेतला. सरपंचपदी निवड झाल्यानंतर किरण गाडेकर यांनी तेल्हारा या स्वेच्छा पुनर्वसित पूरपिडीत गावाच्या नागरी सुविधांच्या मागणीच्या प्रस्तावाचा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून गावाचा विकास साधणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी तेल्हारा ग्रा.प.सदस्य माणिकराव गाडेकर, तुळशीदास पानझाडे, मालता ठोंबरे, शे.रशिद, विष्णू कुटे, बालू कुटे, शे.हमजा शे.अहमद, अशोक गाडेकर, शे.हबीब, अशोक गाडेकर, बळीराम गाडेकर, भुजंग कुटे, मोहन मोसंबे, दिलीप गाडेकर, ग्रामसेवक ननकर यांची उपस्थिती होती. (वा. प्र.)