कीर्तनकार शारदादेवी कमाणी राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:12 PM2017-11-29T13:12:57+5:302017-11-29T13:16:59+5:30
कीर्तनाच्या माध्यमातून लहान मुले, महिलांसाठी जनप्रबोधन करणारे शारदादेवी कमानी यांना राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कीर्तनाच्या माध्यमातून लहान मुले, महिलांसाठी जनप्रबोधन करणारे शारदादेवी कमानी यांना राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शारदाताई शैलेश कमाणी यांनी मुलांचे संस्कार वर्ग, महिलांना मार्गदर्शन व्याख्यान किर्तनाद्वारे समाज प्रबोधन राष्ट्रीय व मानव कल्याण विचारांचा प्रसार, वृक्षारोपण बेटी बचाव, निराश्रीत व अनाथ लहान बालकांसाठी कार्य असे विविध कार्याचे जन प्रबोधन आपल्या कार्यामधून करीत आहेत. या कार्याबद्दल त्यांना २०१७ च्या ‘कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार २०१७ ’ पुरस्काराने मराठवाडा साहित्य संघ सभागृह येथे हभप शामसुंदर महाराज सोन्नर राष्ट्रीय किर्तनकार मुंबई, अॅड.सुधीर कुलकर्णी व अॅड.गणेश शिंदे उच्च न्यायालय औरंगाबाद, अॅड.कृष्णा जगदाळे आयोजक तथा संस्थापक मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई, दादा गोरे कार्यवाह मराठवाडा साहित्य परिषद औ.बाद इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.