बुलडाण्यात किसान सेनेचे आंदोलन : कृषी पंप वीज तोडणीच्या नोटीसची केली होळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:07 AM2017-12-15T01:07:06+5:302017-12-15T01:07:27+5:30
बुलडाणा : थकीत वीज देयकापोटी शेतकर्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी तोडण्यासाठी देण्यात आलेल्या नोटीसची शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्वात किसान सेनेच्यावतीने १३ डिसेंबर रोजी होळी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : थकीत वीज देयकापोटी शेतकर्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी तोडण्यासाठी देण्यात आलेल्या नोटीसची शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्वात किसान सेनेच्यावतीने १३ डिसेंबर रोजी होळी करण्यात आली.
एकीकडे शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात दिरंगाई केली जात आहे. त्यातच कृषी पं पाचा वीज पुरवठा तोडण्याच्या नोटीस शेतकर्यांना दिल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेत शिवसेनेच्या किसान सेनेच्यावतीने १३ डिसेंबर रोजी शेतकर्यांना प्राप्त झालेल्या नोटीसची संगम चौकामध्ये होळी करण्यात आली. रब्बी हंगामामध्ये शेतकर्यांना सिंचनविषयक सुविधांसाठी विद्युत आवश्यक आहे. आर्थिक कंबरडे मोडलेले शेतकरी देयकांची पूर्तता करण्यात यंदा सक्षम नाही. त्या तही वीज वितरण रात्री विद्युत पुरवठा करते. पूर्णक्षमतेने वीज पुरवठा करत नाही. त्यातच रात्री पिकाला पाणी देताना वन्य प्राण्यांकडून शेतकर्यांच्या जीवित्वास धोका निर्माण होत आहे. त्यातच कृषी पंपाच्या वीज जोडणी तोडण्याच्या नोटीस बजावल्या जात आहे.
त्यामुळे किसान सेनेने आक्रमक होत ही होळी केली. या आंदोलनामध्ये किसान सेना उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सिंधुताई खेडेकर, वैशाली ठाकरे, राजू पवार, विजय जायभाये, अशोक इंगळे, दीपक सोनुने, उमेश कापुरे, बाळू धुड, गजेंद्र दांदडे, कैलास माळी यांच्यासह अन्य यात सहभागी झाले होते.