आरक्षणाच्या मागणीसाठी काेळी महादेव बांधव चढले टाॅवरवर; पाेलिसांची तारांबळ
By संदीप वानखेडे | Published: January 9, 2024 03:25 PM2024-01-09T15:25:06+5:302024-01-09T15:26:51+5:30
चार जणांनी घाेषणा देत सुरू केले शाेले आंदाेलन
बुलढाणा : आदिवासी कोळी जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी चार जण बुलढाणा शहरातील बीएसएनएलच्या टाॅवरवर चढले़ अचानक सुरू केलेल्या या आंदाेलनामुळे पाेलिसांची तारांबळ उडाली.
आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या प्रमुख मागणीसाठी २१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्यांमार्पत अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. तसेच बेरार प्रांतातील पाल पारधी, राज पारधी, गाव पारधी, हरण शिकार पारधी या जातीचा विमुक्ती जाती अ मध्ये येतात.
मात्र, नाम साध्यर्माचा लाभ घेऊन त्यांनी अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र मिळविले आहे. उपरोक्त जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे. तसेच आदिवासी कोळी जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी गणेश पांडुरंग इंगळे, गजानन धाडे, संदीप सपकाळ यांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे़ हे उपाेषण सुरू असतानाच काही आंदाेलक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या बीएसएनएलच्या टाॅवरवर चढले विविध घाेषणा देत हे कार्यकर्ते टाॅवरवर चढले़ या आंदाेलनामुळे पाेलिसांची तारांबळ उडाली.