डोणगाव -मेहकर मार्गावर काळीपिवळी- टिप्पर अपघात; आठ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 05:14 PM2018-02-16T17:14:56+5:302018-02-16T17:17:00+5:30

डोणगाव : रेती घेऊन जाणाऱ्या टिप्परने धडक दिल्यामुळे काळीपिवळीतील आठ जण जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान डोणगाव - मेहकर मार्गावरील खान यांच्या शेताजवळ घडली.

Kollipi-Tipper Accident on Dagaanga-Mehkar Road; Eight people injured | डोणगाव -मेहकर मार्गावर काळीपिवळी- टिप्पर अपघात; आठ जण जखमी

डोणगाव -मेहकर मार्गावर काळीपिवळी- टिप्पर अपघात; आठ जण जखमी

Next
ठळक मुद्देमालेगावकडे रेती घेऊन जाणाऱ्या  टिप्पर क्रमांक एम. एच. ३७ जे ७७२२ ने समोरुन येणाऱ्या  एम. एच. २८ एच. १७४४ ला धडक दिली.अपघात घडताच टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढत पोलीस स्टेशन गाठले.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील कारवाई सुरू आहे.

डोणगाव : रेती घेऊन जाणाऱ्या  टिप्परने धडक दिल्यामुळे काळीपिवळीतील आठ जण जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान डोणगाव - मेहकर मार्गावरील खान यांच्या शेताजवळ घडली. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. जखमींवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु असून त्यापैकी तिघांना पुढील उपचारासाठी मेहकरला हलविण्यात आले आहे. मालेगावकडे रेती घेऊन जाणाऱ्या  टिप्पर क्रमांक एम. एच. ३७ जे ७७२२ ने समोरुन येणाऱ्या  एम. एच. २८ एच. १७४४ ला धडक दिली. यामध्ये काळीपिवळीतील आठ जण जखमी झाले. जखमींमध्ये मुस्तफा खान साहेब खान , मोहन जुनघरे, युसूफ खान दिलदार खान सर्व राहणार डोणगाव, गोपाल खंडारे रा. नेतंसा, वसंता दुराजी जाधव रा. लोणी गवळी, अलिम खान सलिम खान रा. घाटबोरी, केतन दत्तात्रय ठाकरे रा. अकोला ठाकरे, भगिरथी जनार्दन शिंदे रा. द्रुक बोरी यांचा समावेश आहे. जखमींवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. दरम्यान त्यापैकी तिघांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी मेहकरला हलविण्यात आले आहे. अपघात घडताच टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढत पोलीस स्टेशन गाठले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: Kollipi-Tipper Accident on Dagaanga-Mehkar Road; Eight people injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.