कोमल झोरेला विद्यापीठाचे सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:27 AM2021-05-30T04:27:33+5:302021-05-30T04:27:33+5:30
२९ मे २०२१ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ आभासी पद्धतीने संपन्न झाला. समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्र ...
२९ मे २०२१ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ आभासी पद्धतीने संपन्न झाला. समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोमल झोरे हिला आभासी पद्धतीने राज्यशास्त्र विषयातील सुवर्णपदक प्रदान करून तिचा गौरव करण्यात आला. यापूर्वीही महाविद्यालयाच्या सरला डोईफोडे आणि अश्विनी साळवे या विद्यार्थिनींनी राज्यशास्त्र विषयात सुवर्णपदक पटकावले होते. राज्यशास्त्र विषयात श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या एखाद्या विद्यार्थ्याने सुवर्णपदक प्राप्त करण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, महाविद्यालयाचे आयक्युएसी समन्वयक डॉ. सुधीर चव्हाण, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनंत आवटी आदींनी तिचे काैतुक केले.