कोराना महामारीमुळे पाळणा लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:37 AM2021-05-20T04:37:45+5:302021-05-20T04:37:45+5:30

जिल्ह्यात २०१९-२० या वर्षामध्ये ४१ हजार ७९० मुले-मुली जिल्ह्यात जन्माला आली, तर २०२०-२१ मध्ये ३७ हजार ९४३ मुले-मुली जन्माला ...

The Korana epidemic prolonged the cradle | कोराना महामारीमुळे पाळणा लांबला

कोराना महामारीमुळे पाळणा लांबला

Next

जिल्ह्यात २०१९-२० या वर्षामध्ये ४१ हजार ७९० मुले-मुली जिल्ह्यात जन्माला आली, तर २०२०-२१ मध्ये ३७ हजार ९४३ मुले-मुली जन्माला आली आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्याचा जन्मदर हा १४.४७ टक्के होता. तो २०२०-२१ मध्ये १२.९८ टक्क्यांवर आला आहे.

लग्नसंख्या घटली

गेल्या वर्षीचा लॉकडाऊन व यावर्षीचे कठोर निर्बंध यामुळे जिल्ह्यात लग्न समारंभांची संख्या घटली आहे. जे काही विवाह सोहळे झाले आहेत, ते मर्यादित स्वरूपात किंवा थेट नोंदणी पद्धतीने झालेले आहेत. लग्न समारंभासाठी अवघ्या २५ व्यक्तींची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी साध्या पद्धतीने विवाह उरकून घेतले. लग्न समारंभातील गर्दीमुळेही काही जणांना प्रशासनाने दंड ठोठावला होता.

जन्मदर घटला

बुलडाणा जिल्ह्याचा जन्मदर २०१९-२० च्या तुलनेत दीड टक्क्याने घसरला आहे. त्यामुळे जिल्ह्याची लोकसंख्याही २९ लाख २२ हजार ७३ वर पोहोचली आहे; अन्यथा ३० लाखांच्या आसपास जिल्ह्याची लोकसंख्या गेली असती. गेल्या वर्षी जिल्ह्याची लोकसंख्या ही २८ लाख ८६ हजार ८० होती. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता जिल्ह्याचा जन्मदर दीड टक्क्याने घसरला आहे. २०१९-२० मध्ये जिल्ह्याचा जन्मदर १४.४७ टक्के होता तो २०२०-२१ मध्ये १२.९८ टक्के झाला आहे.

--

वर्ष जन्म मृत्यू

२०१८-१९ ४३,११५ १३,९३१

२०१९-२० ४१,७९० १४,०६७

२०२०-२१ ३७,९४३ १४,२५९

Web Title: The Korana epidemic prolonged the cradle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.