कोरेगाव भीमा : खामगावात तोडफोडप्रकरणी १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 06:40 PM2018-01-04T18:40:02+5:302018-01-04T18:46:46+5:30
खामगाव : भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान खामगावात झालेल्या तोडफोड प्रकरणी शहर पोलिसांनी वेगवेगळ्या तीन तक्रारीवरून ६५ जणांसह १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
खामगाव : भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान खामगावात झालेल्या तोडफोड प्रकरणी शहर पोलिसांनी वेगवेगळ्या तीन तक्रारीवरून ६५ जणांसह १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बुधवार ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. याला खामगावात व्यापाºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शहरात कडकडीत बंद पाळला. या दरम्यान हिंसक मोर्चेकºयांनी अनेक बंद दुकानांची तोडफोड केली. दगडफेक करून बंद दुकानांच्या काचा फोडल्या तसेच चार कारचीही तोडफोड केली. यात हजारो रूपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला तीन तक्रारी देण्यात आल्या आहेत. या तक्रारींवरून शहर पोलिसांनी ६४ जणांसह १०० ते १५० महिला-पुरूष आंदोलकांवर कलम १४३, १४७, १४८, १४९, ३३६, ३२३, ५०४, ४२७ सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३, ५ व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार यु.के.जाधव यांच्या नेतृत्वात शहर पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)