कोरेगाव भीमा : बुलडाण्यात कडकडीत बंद, बसेसवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 02:22 PM2018-01-03T14:22:24+5:302018-01-04T02:33:28+5:30

बुलडाणा :  भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पृष्ठभूमिवर भारिप-बमंससह विविध संघटनांनी जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदला ३ जानेवारी रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठसह विविध चौकातील तसेच गल्लीतील दुकाने १०० टक्के बंद दिसून आली.

Koregaon Bhima: strike in buldhana | कोरेगाव भीमा : बुलडाण्यात कडकडीत बंद, बसेसवर दगडफेक

कोरेगाव भीमा : बुलडाण्यात कडकडीत बंद, बसेसवर दगडफेक

Next
ठळक मुद्देशहरातील मुख्य बाजारपेठसह विविध चौकातील तसेच गल्लीतील दुकाने १०० टक्के बंद दिसून आली.राज्य परिहवन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने बसगाड्या न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धाड, लोणार, चिखली, मोताळा, देऊळगाव राजा, मेहकर, सिंदखेड राजासह विविध ठिकाणची दुकाने १०० टक्के बंद दिसून आली.

बुलडाणा :  भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पृष्ठभूमिवर भारिप-बमंससह विविध संघटनांनी जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदला ३ जानेवारी रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठसह विविध चौकातील तसेच गल्लीतील दुकाने १०० टक्के बंद दिसून आली. यावेळी कोणतीही विपरित घटना घडू नये म्हणून शहरातील विविध चौकात पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद शहरात मंगळवारी उमटले. सकाळी संतप्त जमावाने विविध चौकात निषेध नोंदविला. जनता चौकासह विविध प्रतिष्ठाने, एस.टी.बसेसवर दगडफेक झाली.  त्यात ३ एस.टी.बससह काही प्रतिष्ठानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी ७ तरूणांना ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बमंससह विविध संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ, आठवडी बाजारासह कारंजा चौक, जयस्तंभ चौक, संगम चौक, त्रिशरण चौकातील दुकाने १०० टक्के बंद दिसून आली. मात्र एस.टी.बस व खाजगी प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे बाहेरगावी जाणाºयांना त्रास सहन करावा लागला. 
बुधवारी जिल्ह्यातून एकही बस सोडण्ता आली नाही. मंगळवारच्या अनुभवानंतर राज्य परिहवन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने बसगाड्या न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बसस्थानक परिसरात कोणतीही विपरित घटना घडू नये म्हणून पोलिसांच्या एका विशेष तुकडीसह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



शाळा, महाविद्यालयाने दिली सुटी, खाजगी क्लासेसही बंद
शहरातील सर्वच शाळा, महाविद्यालये महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाले. सकाळी शाळा, महाविद्यालयात येणाºया विद्यार्थ्यांनी घरी परत पाठवून सुटी जाहीर केली. या पृष्ठभूमिवर खाजगी क्लासेसच्या संचालकांनीही विद्यार्थ्यांना सुटी जाहीर केली. त्यामुळे नेहमी गजबजलेले शाळा, महाविद्यालये तसेच विविध चौकात तणावपूर्ण शांतता दिसून येत होती. 

ग्रामीण भागातही बंदला प्रतिसाद, जानेफळ येथे मोर्चा
बुलडाणा शहरासह ग्रामीण भागातही महाराष्ट्र बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला तर मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे विधिध संघटनेच्या पदाधिकाºयांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केलाा. बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट येथेही १०० टक्के दुकाने बंद होती. तर विविध संघटनेच्या पदाधिकाºयांनी एकत्र येत घटनेचा निषेध व्यक्त केला. याशिवाय धाड, लोणार, चिखली, मोताळा, देऊळगाव राजा, मेहकर, सिंदखेड राजासह विविध ठिकाणची दुकाने १०० टक्के बंद दिसून आली.

Web Title: Koregaon Bhima: strike in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.