कोरेगाव भीमा घटनेचे बुलडाण्यातील खामगावात पडसाद, राष्ट्रीय महामार्गावर फोडली एसटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 12:00 PM2018-01-02T12:00:47+5:302018-01-02T12:06:15+5:30
पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गटात झालेल्या वादाचा निषेध करण्यात येत आहे
खामगाव ( बुलडाणा ) - पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गटात झालेल्या वादाचा निषेध करण्यात येत आहे. याचे पडसाद खामगाव तालुक्यातही उमटले. निषेध म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्री गवळी येथे एका एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एमएच-१४ बीटी -३२७४ या अकोला-नाशिक या बसवर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीदरम्यान बसमध्ये २६ प्रवासी तसेच चालक आणि वाहक होते. या प्रकरणी चालकाने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे. दरम्यान, बसमधील प्रवासी सुखरूप असून एसटी बस खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरात आणण्यात आली आहे.