धाड येथे कोविड रुग्णालय सुरू हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:29 AM2021-05-03T04:29:18+5:302021-05-03T04:29:18+5:30
धाड : परिसरात गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे़ सरकारी काेविड केअर सेंटरमध्ये ...
धाड : परिसरात गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे़ सरकारी काेविड केअर सेंटरमध्ये एकही बेड शिल्लक नसल्याने काेराेना रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये महागडे उपचार घ्यावे लागत आहे़ त्यामुळे, चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी धाड येथेही ५० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यासाठी धाड येथील मौलाना अबुल कलाम उर्दू शाळा इमारतीची त्यांनी पाहणी केली़
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना वाढत्या रुग्णसंख्येमुळे दवाखाने अपुरे पडत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचार मिळत नाही. त्यासाठी आमदार श्वेता महाले यांच्या प्रयत्नाने चिखली येथे ५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू होत असून सोबतच धाड येथेसुद्धा ५० खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे़ या रुग्णालयांत रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. सोबतच जेवण व औषधीसुद्धा मोफत देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने श्वेता महाले यांनी धाड येथील मौलाना अबुल कलाम उर्दू शाळा इमारतीची पाहणी करून रुग्णालय तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या़ काेराेनाकाळात चिखली विधानसभा मतदारसंघात चिखली येथे दोन ठिकाणी, तर धाड येथे प्रत्येकी ५० खाटांचे अशी १५० खाटांची तीन रुग्णालये याच आठवड्यात रुग्णसेवेत सुरू होत आहे. ही तीनही रुग्णालये वाढती रुग्णसंख्या पाहता पुरेशी जरी नसली, तरी काही प्रमाणात रुग्णांना आधार देणारी असल्याचे आमदार श्वेता महाले यांनी यावेळी सांगितले़